शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियाच्या मायलेकींनी अनुभवले नेपाळमध्ये भूकंपाचे ६० हादरे

By admin | Updated: April 28, 2015 00:58 IST

यात्रा करायला गेलेल्या गोंदियातील मायलेकींनी नेपाळ येथील भूकंपाचे ६० हादरे अनुभवले. नशिब बलवत्तर

६० हादऱ्यांनी जीव टांगणीला : भारतात सुखरूप दाखल, आज गोंदियात पोहोचणारगोंदिया : यात्रा करायला गेलेल्या गोंदियातील मायलेकींनी नेपाळ येथील भूकंपाचे ६० हादरे अनुभवले. नशिब बलवत्तर म्हणऊनच त्यांचा जीव वाचला. जीव मुठीत घेऊन बसलेल्या या मायलेकींसह त्यांच्यासोबतचे यात्रेकरून सुदैवाने भारतात सुखरूप परतले. मात्र तब्बल सात तास गोंदियातील गुप्ता परिवाराच जीव टांगणीला लागला होता. गोंदियातील शशिकांत गिरधरभाई कोटक (७४) यांच्या तीन विवाहित मुली आपापल्या कुटुंबीयांसह नेपाळच्या काठमांडू येथे फिरायला गेल्या होत्या. एक मुलगी छत्तीसगडच्या राजनांदगाव येथील प्रतीक्षा परेश सोनछात्रा (४२), अमरावती येथील राधा अमिषकुमार राजा (४०), अमित राजा (४५) त्यांची मुलगी दिशिता अमिषकुमार राजा (१६), तर गोंदियातील यामिनी विशाल गुप्ता (३८) व खुशी विशाल गुप्ता (७) हे सहा जण २२ एप्रिल रोजी नागपूरवरून गोरखपूरमार्गे काठमांडूसाठी रवाना झाले. २५ रोजी सकाळी दर्शनासाठी गेले असताना त्याचवेळी भूकंपाचे हादरे बसले. त्यावेळी ते स्वत:चा बचाव करीत पहाडीवरून बसच्या सहाय्याने खाली उतरले. त्यांनी ती रात्र मैदानात घालविली. रविवारी ते सकाळी ११ वाजतादरम्यान बसने पोखरा येथून निघाले. सकाळी ते गोरखपूरला आले. आता नागपूरला येण्यासाठी प्रवासातच आहेत. नेपाळ येथे एका-मागून एक असे अनेक हादरे त्यांनी अनुभवले. परिसरातील घर पडलेले काही ठिकाणी मृतदेह मलब्यात अडकलेले असा थरार त्यांनी अनुभवला. नेपाळमध्ये भूकंप आल्याची वार्ता कानी पडताच त्यांच्या नातेवाईकांनी टीव्हीवरील बातम्या सुरू करून नेपाळ येथे गेलेल्या नातेवाईकांना फोन वरून सतत संपर्क केला. कुणी देवाला साकडे घालायचे तर कुणी नवस फेडण्याची तयारी दर्शवायची. नातेवाईक एकमेकांना फोन लावून तुमचा संपर्क त्यांच्याशी झाला का हेच विचारणा करीत होते. तब्बल सात तासानंतर सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास त्यांच्याशी संपर्क झाला, ‘आम्ही सुरक्षित आहोत’ ही वार्ता कानी पडताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. परंतु सुखरूप भारतात परतत नाही तेव्हापर्यंत त्यांच्या मनात भितीच होती. सकाळी कानपूर येथे पोहोचले असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा श्वास सोडला. त्या यात्रेकरूंना जेवणाची सोय नाही, पाण्याची सोय नाही. जो तो भयभीत असलेले चित्र तिथे होते, असे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)रेल्वे कर्मचारी व गोरखपुरात मदतनेपाळ येथे गेलेल्या या गोंदियाकरांना नेपाळमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी व गोरखपूर येथे पप्पूभाई अग्रवाल नावाच्या व्यक्तीने बरीच मदत केली. जेवनापासून झोपण्यापर्यंतची सोय त्यांनी करून दिली. मात्र कानपूरपर्यंत या प्रवाश्यांंना कसलीही मदत मिळाली नव्हती.