शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यात गोंदिया रेल्वेला ५.६८ कोटींचे उत्पन्न

By admin | Updated: May 25, 2014 23:40 IST

गोंदिया रेल्वे स्थानक दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे महत्त्वपूर्ण जंक्शन आहे. येथूच चारही दिशांना रेल्वेगाड्या धावतात. उन्हाळा, लग्नसराईचे दिवस व प्रवाशांची रेल्वे प्रवासाला पसंती यामुळे मार्च व एप्रिल

देवानंद शहारे- गोंदिया

गोंदिया रेल्वे स्थानक दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे महत्त्वपूर्ण जंक्शन आहे. येथूच चारही दिशांना रेल्वेगाड्या धावतात. उन्हाळा, लग्नसराईचे दिवस व प्रवाशांची रेल्वे प्रवासाला पसंती यामुळे मार्च व एप्रिल या दोन महिन्यात गोंदिया रेल्वे स्थानकातून एकूण ११ लाख ६९ हजार नऊ प्रवाशांनी प्रवास केला. त्याद्वारे या दोन महिन्यात गोंदिया रेल्वेला एकूण पाच कोटी ६७ लाख २२ हजार ९0३ रूपयांचे रूपयांचे उत्पन्न मिळाले.

गोंदिया रेल्वे स्थानकावर चार दिशेने येणार्‍या प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. मार्च महिन्यात येथील तिकीट खिडक्यांवरून (बुकींग) एकूण पाच लाख ४६ हजार ३२६ प्रवाशांनी तिकिटे खरेदी केल्या. त्याद्वारे गोंदिया रेल्वेला एक कोटी ७७ लाख ७९ हजार ५७३ रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर याच महिन्यात २६ हजार ९२२ प्रवाशांनी तिकिटे आरक्षित करून आरक्षण बोगींमधून प्रवास केला. या आरक्षित तिकिटांद्वारे गोंदिया रेल्वेला ९७ लाख ३४ हजार ८९0 रूपयांचे उत्पन्न मिळाले. अशाप्रकारे मार्च महिन्यात एकूण पाच लाख ७३ हजार २४८ प्रवाशांच्या बुकिंग व रिझर्वेशन तिकिटांद्वारे गोंदिया रेल्वेला एकूण दोन कोटी ७५ लाख १४ हजार ४६३ रूपयांचे उत्पन्न मिळाले.

एप्रिल महिन्यात तिकीट खिडक्यांवरून पाच लाख ६९ हजार ७५0 प्रवाशांनी तिकिटे खरेदी करून प्रवास केला. त्याद्वारे गोंदिया रेल्वेला एक कोटी ९५ लाख ६९ हजार ७५0 रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर २६ हजार 0११ प्रवाशांनी तिकिटे आरक्षित करून आरक्षण बोगींतून प्रवास केला. त्याद्वारे गोंदिया रेल्वेला ९६ लाख ३८ हजार ६९0 रूपयांचे उत्पन्न मिळाले. एप्रिल महिन्यात बुकिंग व आरक्षित तिकिटांद्वारे गोंदिया रेल्वे स्थानकातून एकूण पाच लाख ९५ हजार ७६१ प्रवाशांनी प्रवास केला. त्याद्वारे गोंदिया रेल्वेला एकूण दोन कोटी ९२ लाख आठ हजार ४४0 रूपयांचे उत्पन्न मिळाले.

मार्च व एप्रिल महिन्यात तिकीट खिडक्यांवरून एकूण ११ लाख १६ हजार 0७६ प्रवाशांनी तिकिटे खरेदी केल्या. या दोन्ही महिन्यांच्या बुकिंगद्वारे गोंदिया रेल्वेला एकूण तीन कोटी ७३ लाख ४९ हजार ३२३ रूपये उत्पन्न होते. तसेच मार्चपेक्षा एप्रिल महिन्यात २३ हजार ४२४ अधिकच्या तिकीट बुकींगच्या प्रवाशांची वाढ झाली. त्या वाढीव प्रवाशांमुळे गोंदिया रेल्वेला मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये १७ लाख ९0 हजार १७७ रूपयांचे अधिकचे उत्पन्न मिळाले.

मार्च व एप्रिल या दोन्ही महिन्यात आरक्षित तिकिटांद्वारे एकूण ५२ हजार ९३३ प्रवाशांनी प्रवास केला. त्याद्वारे गोंदिया रेल्वेला एक कोटी ९३ लाख ७३ हजार ५८0 रूपयांचे उत्पन्न मिळाले. मात्र, मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात आरक्षित बोगींमधून कमी प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे मार्चपेक्षा एप्रिल महिन्याच्या आरक्षित तिकिटांतून होणार्‍या उत्पन्नात घट झाली. मार्चपेक्षा एप्रिल महिन्यात एकूण ९११ प्रवाशांची तिकीट आरक्षणात घट झाली. त्यामुळे एप्रिल महिन्यात आरक्षित तिकिटांचे उत्पन्न मार्चपेक्षा ९६ हजार २00 रूपयांनी घटले.

बुकिंग व आरक्षण यातील संपूर्ण प्रवाशी बघता मार्चपेक्षा एप्रिल महिन्यात एकूण २२ हजार ५१३ अधिकच्या प्रवाशांनी गोंदिया रेल्वे स्थानकातून प्रवास केला. त्यामुळे मार्च महिन्यापेक्षा एप्रिल महिन्यात गोंदिया रेल्वेचे १६ लाख ९३ हजार ९७७ रूपयांचे एकूण उत्पन्न वाढले.