गोंदिया-इंदूर-मुंबई प्रवासी विमानसेवा १५ जानेवारीपासून होणार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 19:32 IST2026-01-03T19:30:24+5:302026-01-03T19:32:08+5:30
Gondia : तालुक्यातील बिरसी विमानतळावरून सध्या गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती आणि गोंदिया-इंदूर-बंगळूर या दोन मार्गावर स्टार एअर व इंडिगो विमान कंपनीने प्रवासी सुरू केली आहे.

Gondia-Indore-Mumbai passenger flight service to start from January 15
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळावरून सध्या गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती आणि गोंदिया-इंदूर-बंगळूर या दोन मार्गावर स्टार एअर व इंडिगो विमान कंपनीने प्रवासी सुरू केली आहे. मात्र याचा अधिक विस्तार करीत स्टार एअर कंपनीने आता गोंदिया-इंदूर-बंगळूर या मार्गावर प्रवासी विमानसेवा १५ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोंदियाहून इंदूरसह आता मुंबईला उड्डाण घेण्याचा प्रवाशांचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्टार एयर लाईन्सने काही काळापूर्वी गोंदिया विमानतळावरून इंदूर विमानतळासाठी सुरू केलेली उड्डाण सेवामध्ये काही तांत्रिक कारणांमुळे काही दिवस बंद केली होती. मात्र नववर्षात या विमान कंपनीने १५ जानेवारीपासून ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चार पाच महिन्यापूर्वीच इंडिगो विमान कंपनीने गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती या मार्गावर बिरसी विमानतळावरून प्रवासी विमानसेवेला प्रारंभ केला होता. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या कंपनीने मुंबई गोंदिया-मुंबई-छत्रपती सुध्दा नवीन विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्यानंतर संभाजीनगर या मार्गावर प्रवासी सुरू करण्याचा मानस व्यक्त केला होता. दरम्यान आता स्टार एअर कंपनीने १५ जानेवारीपासून मुंबई-इंदूर-गोंदिया व गोंदियाहून-इंदूर-मुंबईला जाणारी उड्डाणे आठवड्यातून सोमवार, मंगलवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवार या ५ दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गोंदियाहून थेट मुंबई विमानसेवा सुरू करण्याची मागणी गेल्या वर्षापासून केली जात होती. आता या मार्गावर विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला असून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भेट मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे. गोंदिया-इंदूर-मुंबई या मार्गावरील विमानसेवेसाठी शनिवारपासून (दि.३) पासून स्टार एयरच्या अधिकृत वेबसाइटसह इतर ऑनलाइन पोर्टल्सवर तिकीट बुकिंग करता येणार आहे.
कार्गो सेवा सुरू करण्याची मागणी
गोंदिया तालुक्यातील बिरसी येथे १ आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे. या विमानतळावरून आता प्रवासी विमानसेवेला सुद्धा प्रारंभ झाला आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यात चांगल्या प्रतीच्या तांदळाचे उत्पादन घेतले जाते. तसेच भाजीपाला आणि फळपिकांचे उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे गोंदिया विमानतळावरून कार्गो सेवेला सुरुवात झाल्यास शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल देशविदेशात पाठविण्यास मदत होईल. तसेच येथील राईस मिलर्सला त्यांचा तांदूळ देश-विदेशात पाठविण्यास मदत होईल.
लगतच्या दोन राज्यातील प्रवाशांना होणार लाभ
गोंदिया जिल्ह्याला लागूनच मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. तर हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख रेल्वे स्थानक असल्याने या दोन्ही राज्यातील प्रवाशांची येथून सातत्याने वर्दळ सुरू असते. बिस्सी विमानतळावरून प्रवासी विमानसेवेला सुरुवात झाल्याने या दोन्ही राज्यातील प्रवाशांना सुध्दा सोयीचे झाले आहे.