शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
4
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
5
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
6
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
7
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
8
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
9
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
10
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
11
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
12
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
13
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
14
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
15
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
16
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
17
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
18
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
19
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
20
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
Daily Top 2Weekly Top 5

योग्य सन्मान द्या, अन्यथा...

By admin | Updated: February 3, 2015 22:58 IST

भारतीय जनता पक्षातील असंतुष्ट गटाने जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवनकर यांच्या नेतृत्वात १ फेबु्रवारीला घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत वारंवार पक्षाकडून मिळणाऱ्या

असंतुष्टांचा इशारा : भाजप कार्यकर्त्यांची स्वपक्षावरच नाराजीआमगाव : भारतीय जनता पक्षातील असंतुष्ट गटाने जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवनकर यांच्या नेतृत्वात १ फेबु्रवारीला घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत वारंवार पक्षाकडून मिळणाऱ्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षातील नेत्यांविरुद्ध ताशेरे ओढताना योग्य सन्मान राखा, अन्यथा वेगळा विचार केला जाईल, असा इशारा अनेकांनी दिला. आमगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात गटागटाचे राजकारण होत असल्याने भाजपात असंतोष धुसफुसत आहे. आमगाव तालुका भाजपाच्या बैठकीत शिवणकर गटाच्या नेत्यांना डावलल्याचे कारण पुढे करुन समर्थकांनी रविवारी सभा घेतली. सरस्वती विद्यालयात कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण करून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या शक्तिप्रदर्शनात जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हा परिषद सदस्य तुंडीलाल कटरे, छोटू बहेकार, संगीता दोनोडे, मुक्तानंद पटले, पंचायत समिती सदस्य रज्जू भक्तवर्ती उपस्थित होते. यावेळी विजय शिवणकर यांनी पक्षाकडून योग्य वागणुक मिळत असल्याचे कारण पुढे करीत आपण पक्षाकरीता सतत कार्यशील असल्याचे सांगितले. पक्षात नेहमी डावलण्याची भूमिका आता खूप झाली आहे. आपण काही चुकीचे केले असे वाटत असल्यास पक्षाने बाहेर काढण्याचा निर्णय का घेतला नाही, असा उलट प्रश्न करुन पक्षाने शिस्तीने वागावे, अन्यथा वेगळा विचार केला जाईल, असा इशाराही दिला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त करीत पक्ष सोडण्याची भावना व्यक्त केली. या बैठकीला विविध भागातून कार्यकर्ते उपस्थित होते. प्रामुख्याने आमगाव, सालेकसा व देवरी तालुक्यातील असंतुष्ट कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. परंतु अनेक पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांनी या शक्तिप्रदर्शनापासून स्वत:ला दूर ठेवल्याचे दिसून आले. (शहर प्रतिनिधी)