शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील महिलांना मोफत शिवणकला प्रशिक्षण

By admin | Updated: March 31, 2016 02:03 IST

अदानी फाऊंडेशन तिरोडाद्वारे संचालित जनशिक्षण संस्था गोंदिया यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली सक्षम शिवणकला प्रशिक्षण केंद्र मेंदिपूर...

४० प्रशिक्षणार्थींचा सहभाग : अदानी फाऊंडेशन तिरोडाचा उपक्रमगोंदिया : अदानी फाऊंडेशन तिरोडाद्वारे संचालित जनशिक्षण संस्था गोंदिया यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली सक्षम शिवणकला प्रशिक्षण केंद्र मेंदिपूर व शांती शिवणकला प्रशिक्षण केंद्र टिकारामटोला येथील उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच समारोपीय कार्यक्रम टिकारामटोला काचेवानी येथील समाजमंदिरात घेण्यात आला. सदर दोन्ही प्रशिक्षण केंद्रात एकूण ४० प्रशिक्षणार्थ्यांनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. याप्रसंगी प्रामुख्याने अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेडचे स्टेशन हेड सी.पी. शाहू, हेड आॅपरेटर समीर मित्रा, नितीन पाठक, मेंदिपूरच्या सरपंच मुक्ता रहांगडाले आदी मान्यवर उपस्थित होते.आपल्या मार्गदर्शनात सी.पी. शाहू म्हणाले, महिला-पुरूष हे संसरारूपी गाडीचे दोन चाक असून स्त्री ही पुरूषापेक्षा कुठेही कमी नाही. अशा प्रशिक्षणाच्या माध्यमातून ती आपले कौशल्य विकास करून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहास हातभार लावू शकते. अदानी फाऊंडेशन महिलांना रोजगार निर्मितीकरिता प्रेरित करून सक्षम बनविण्याचा उदात्त हेतू ठेवूनच विकासात्मक कार्य करीत राहणार आहे, असे सांगून स्टेट बँक अपघात विमा व नशामुक्ती या विषयी माहिती सांगितली.समीर मित्रा म्हणाले, या प्रशिक्षणामध्ये ज्या महिला व मुलींनी प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र मिळविले, त्यांनी येथेच न थांबता पुढे भरारी घ्यावी व आधुनिक व्यवसायात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे सांगितले. नितीन पाठक मार्गदर्शन करताना म्हणाले, यात ज्या महिला व मुलींनी प्रशिक्षण घेतले, त्यांनी आपला व्यवसाय थाटून आपल्या कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी मदत करावी, असे सांगितले. कार्यक्रमात उपस्थित मेंदिपूर येथील सरपंच मुक्ता रहांगडाले यांनी, अदानी फाऊंडेशनने या सहामाही शिवणकला प्रशिक्षणामध्ये एक नाविण्यपूर्ण व स्वयंपूर्ण असे प्रशिक्षण दिले. ते सर्वसुविधायुक्त असल्याचे सांगून सर्वच प्रशिक्षणार्थ्यांची कापड शिवणकामाबद्दलची फिनिशिंग उत्तम असल्याचे निरीक्षण करून सांगितले. तसेच त्यांनी अदानी फाऊंडेशनचे आभार मानले. आपल्या प्रास्ताविकात जनशिक्षण संस्थेचे संचालक सम्राट पाल यांनी, शिवणकला प्रशिक्षण उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना मिळणाऱ्या प्रमाणपत्राचा लाभ विविध शासकीय योजनांसाठी होतो, असे सांगितले. अदानी फाऊंडेशनने प्रशिक्षण दिल्याबद्दल त्यात सहभागी ४० प्रशिक्षणार्थ्यांनी फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले.(प्रतिनिधी)