शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान युगातही होताहेत रोगराईवर भोंदूगिरीने उपाय

By admin | Updated: October 30, 2014 22:54 IST

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मानवाने असाध्य गोष्टी साध्य करीत प्रगतीचा उच्चांक गाठला आहे. विज्ञानाच्या वाढत्या प्रभावाने मानवाचे जीवन अधिक प्रभावशाली व गतीमान झाले आहे.

रावणवाडी : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मानवाने असाध्य गोष्टी साध्य करीत प्रगतीचा उच्चांक गाठला आहे. विज्ञानाच्या वाढत्या प्रभावाने मानवाचे जीवन अधिक प्रभावशाली व गतीमान झाले आहे. परंतु आताही ग्रामीण भागात अंधश्रद्धेचा अंधार कायम आहे. ग्रामीण भागात आजसुध्दा चक्क धान पिकांच्या आजारावरही भोंदूगिरीचा आश्रय घेऊन उपचार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात विज्ञानाने आज बऱ्याच क्षेत्रात भक्कम प्रगती केली असली तरी आजही ग्रामीण भागातील खेड्यात बऱ्याच ठिकाणी पुरेशा प्रमाणात आरोग्य सेवा पोहचली नाही. त्यातही दुर्गम आदिवासी भागात अंधश्रध्देचे मूळ खोलवर रुजलेले असल्याने व पुरेशी आरोग्य सेवा पोहलचलीच नसल्याने विविध आजारावर अंधश्रध्देतूृन भोंदूबाबांकडून उपचार केले जातात. हा प्रकार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यात पहावयास मिळत आहे. प्रामुख्याने आदीवासीबहुल गावांमध्ये आतासुध्दा तंत्रमंत्र व जादूटोणाचे प्रकार आढळत आहे. ग्रामीण परिसरात जनावरावर व धानावर अचानक एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास गावातील गुरे मृत्यूच्या खाईत जातात किंवा वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडतात. अशा वेळी मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे मरीमायचा प्रकोप ही भावना घर धरून ठेवत आहे. यावर तोडगा म्हणून गावातील सर्व नागरिकांच्या सहमतीने बैठक घेऊन गावाची शांती करण्यासाठी जादूटोणा, तंत्रमंत्र, भूतप्रेत उतरवण्यासाठी गाव बांधणीची योजना आखली जाते. गाव बांधण्याचा या साधनुकीसाठी दूर-दूर वरून बाहेरील पंडे- पुजारी व तांत्रीक यांच्याशी पैशाची बोलणी करून तांत्रीकांना बोलाविण्यात गेले. यासाठी समस्त गावकरी वर्गणी करून पैसा गोळा करून साधनुकीसाठी तसेच तांत्रीकांना मोबदला देण्यासाठी सोबतच पूजा सामग्री, धागेदोरे, लिंबू, कोंबडा, दारू असे बरेचसे साहित्य खरेदी करून हवन पूजन करण्यात येते. या हवन पूजन काळात गावातील कोणीही नागरिक गावाबाहेर जाणार नाही आणि कोणतेही खासगी कार्य यावेळी होणार नाही, असे तांत्रिकाकडून फर्मान सोडण्यात येते. बऱ्याच अटी ठेवण्यात येत असतात. विशेष म्हणजे अनिष्ट प्रथा व चालीरीती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी त्यांना अपयशच मिळत आहे. नागरिकांमध्ये अद्यापही वैज्ञानिक दृष्टी नसल्याचे जाणवते. आता नवीन जादूटोणाविरोधी कायद्याने या गोष्टींना आळा बसण्याची शक्यता आहे.(वार्ताहर)