गोंदिया जिल्ह्यात चारचाकी व दुचाकीची धडक; तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 01:55 PM2020-02-17T13:55:05+5:302020-02-17T13:55:26+5:30

देवरी तालुक्यातील सिरपूर बांध येथे सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास एका चारचाकीची धडक लागून दुचाकीस्वाराचे अपघाती निधन झाले.

Four-wheeler and two-wheeler collision in Gondia district; Kill the young | गोंदिया जिल्ह्यात चारचाकी व दुचाकीची धडक; तरुण ठार

गोंदिया जिल्ह्यात चारचाकी व दुचाकीची धडक; तरुण ठार

Next
ठळक मुद्देदवाखान्यात असलेल्या आजोबांसाठी नेत होता डबा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: देवरी तालुक्यातील सिरपूर बांध येथे सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास एका चारचाकीची धडक लागून दुचाकीस्वाराचे अपघाती निधन झाले. सिरपूरचा रहिवासी असलेला विवेक आनंदराव मेंढे (२२) हा युवक आपल्या दुचाकीने जात असताना त्याला समोरून येणाऱ्या चारचाकीने धडक दिली. या अपघातात विवेक गंभीररित्या जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
राष्ट्रीय महामार्ग ६ च्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने हा मार्ग एकेरी झाला आहे. त्यामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत. विवेक मेंढे याच्या आजोबांचाही एक दिवसाआधी या रस्त्यावर अपघात झाला होता व ते देवरी येथील रुग्णालयात होते. त्यांना दुपारचा डबा नेऊन देत असताना विवेकला अपघात झाला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Four-wheeler and two-wheeler collision in Gondia district; Kill the young

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात