शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यात १६ हजार ६६८ कारवाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2016 01:23 IST

वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे यासाठी पोलीसांचा वाहतूक विभाग सज्ज आहे.

वाहतुकीचे नियमभंग : १३ लाख २४ हजारांचा दंड वसूलगोंदिया : वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे यासाठी पोलीसांचा वाहतूक विभाग सज्ज आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्याच्या कालावधीत वाहतूक नियंत्रण शाखा गोंदिया व जिल्हा पोलीसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. या चार महिन्यात १६ हजार ६६८ कारवाया करण्यात आल्या असून त्या वाहन चालकांकडून १३ लाख २३ हजार ७०० दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांना चपराक देण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने उन्हातान्हात कारवाईची धडक मोहीम राबविली. जिल्हाभरात ही कारवाई करून वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून वचक ठेवण्याचा प्रयत्न केला. जानेवारी महिन्यात ३ हजार २४२ या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या वाहन चालकांकडून २ लाख ५४ हजार ९०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात २ हजार १७१ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.त्या वाहन चालकांकडून ४ लाख ३९ हजार ५०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. मार्च महिन्यात २ हजार २७७ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या वाहन चालकांकडून ४ लाख ५० हजार ४०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात ३ हजार ९७८ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.त्या वाहन चालकांकडून १ लाख ७८ हजार ९०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात वाहनांवर कारवाई करण्यात आली. परंतु दंडाचे प्रमाण कारवाईच्या दृष्ट्रीने अत्यल्प असल्याने एप्रिल महिन्यातील कारवाईची रक्कम मे महिन्यात जुळणार असल्याचे वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्याने सांगितले. (तालुका प्रतिनिधी)२४ वाहनांचा निलंबनाचा प्रस्ताववारंवार दंड आकारुन किंवा सूचना देऊनही वाहतूक नियम मोडणाऱ्या २४ वाहनांना निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक शाखेने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे टाकला आहे. जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात वाहने निलंबति करण्यासाठी एकही प्रस्ताव पाठवला नाही. मात्र मार्च महिन्यात १० तर एप्रिल महिन्यात १४ वाहन निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. यात आमगाव येथील दोन वाहनांचा प्रस्ताव असून उर्वरित सर्व प्रकरण वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईचे आहेत. निलंबनाचे प्रस्ताव काळीपिवळी व आॅटो या वाहनाचे आहेत.