शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुरूस्तीसाठी चार कोटींचा निधी

By admin | Updated: November 15, 2014 22:49 IST

बोंडगावदेवी प्रभागाचे नेतृत्व करणारे जिल्हा परिषद सदस्य अरविंद शिवणकर यांनी जिल्हास्तरावर शर्तीचे प्रयत्न करून परिसरातील रस्त्यांच्या खडीकरण, डांबरीकरण व सिमेंटीकरणासाठी चार कोटींचा

बोंडगावदेवी : बोंडगावदेवी प्रभागाचे नेतृत्व करणारे जिल्हा परिषद सदस्य अरविंद शिवणकर यांनी जिल्हास्तरावर शर्तीचे प्रयत्न करून परिसरातील रस्त्यांच्या खडीकरण, डांबरीकरण व सिमेंटीकरणासाठी चार कोटींचा निधी मंजूर करवून घेतला आहे.प्रभागातील काही रस्त्यांची दयनिय अवस्था झाली होती. ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेऊन जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. शिवणकर यांचे प्रयत्न सार्थकी झाले. जिल्हा वार्षिक योजनेतून रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी निधी मंजूर करण्यात अखेर यश आले. परिसरातील रस्त्याचा निश्चितच कायापालट होणार आहे. परिसरातील काही रस्त्यांची अत्यंत दयनिय अवस्था झाली होती. जेव्हापासून डांबरीकरण झाले त्या रस्त्याकडे कोणीही नजरच फिरविली नाही. अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडून मोठे भगदाड पडलेले आजघडीला दिसतात. सदर रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले होते. काही मार्गावरून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. सदर रस्त्याची खस्ता झाल्याचे ग्रामस्थांनी जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांच्या लक्षात आणून दिले. जिल्हास्तरावर सातत्याने पाठपुरावा करून शिवणकर यांनी परिसरातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आले. मंजुर झालेल्या निधीमध्ये येरंडी ते बाक्टी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १० लाख, खांबी ते इंझोरी रस्त्यासाठी ५ लाख, दाभना ते अर्जुनी ५ लाख, पिंपळगाव ते सावरटोला रस्त्यासाठी १५ लाख, इंझोरी ते बोरटोला रस्त्याच्या खडीकरणासाठी १३ लाख, सीडी वर्कसाठी ७ लाख, डांबरीकरणासाठी ५ लाख, बोंडगावदेवी- बोदरा रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी १५ लाख, जिल्हा वार्षिक योजनेच्या ३०-५४, एफडीआर योजनेंतर्गत मंजूर झाले. १३ व्या वित्त आयोगातून अरततोंडी १.७७ लाख, घुसोबाटोलाचे १ लाखाचा निधी, सुकळीफाटा, दाभना अरततोंडी, पिंपळगाव-चाप्टी येथील काम मंजूर करण्यात आले.