शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे गोंदिया जिल्ह्यातील ७०५९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 22:34 IST

२६ ते २९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील १५ हजार हेक्टरमधील धान पिकांना बसला होता. या नुकसानीचे कृषीे आणि महसूल विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले.

ठळक मुद्दे१३ हजार ५६२ शेतकरी भरपाईस पात्र ८ कोटी ९४ लाख रुपयांची मदत मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात २६ ते २९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील १५ हजार हेक्टरमधील धान पिकांना बसला होता. या नुकसानीचे कृषीे आणि महसूल विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. यात ७०५९ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल या दोन्ही विभागाने शासनाकडे पाठविला होता.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होवून त्याचा धानपिकांना मोठया प्रमाणात फटका बसला होता. तसेच घरांची सुध्दा पडझड झाली होती. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. केंद्राच्या चमूने सुध्दा जिल्ह्याचा दौरा करुन नुकसानीची पाहणी केली होती. अतिवृष्टी आणि मध्यप्रदेशातील संजय सरोवरचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील ३० गावांना पुराचा फटका बसला. जवळपास ३ दिवस धानपिक पाण्याखाली राहिल्याने संपूर्ण धान सडले. तर काही शेतकऱ्यांची रोवणी वाहून गेली. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले. या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे मते १५ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. पण कृषी आणि महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ७०५९ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. याचा अहवाल सुध्दा शासनाला पाठविण्यात आला होता. त्यानुसार शासनाने नुकसान भरपाईपोटी ८ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नुकसान भरपाईसाठी १३ हजार ५६२ शेतकरी पात्र ठरले आहेत. नुकसान भरपाईचा निधी सुध्दा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून त्याचे वाटप सुरू केले जाणार असल्याची माहिती आहे.

नुकसानीच्या तुलनेत मदत अल्पचपुरामुळे गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील १५ हजार हेक्टरवरील धान पिकाचे नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांची रोवणी वाहून गेल्याने त्यांना पूर्ण खरीप हंगामाला मुकावे लागले. पण त्यातुलनेत शासनाने मंजूर केलेली नुकसान भरपाईची रक्कम फारच कमीे असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

 

 

टॅग्स :agricultureशेतीfloodपूर