शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळात १८.६७ लाखाचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा कर्फ्यू करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्य सरकाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियमान्वये कारवाई करून दंड वसूल करण्याची मोहीम जिल्हा वाहतूक शाखेने चालविली आहे.

ठळक मुद्दे९०७८ वाहन चालकांना दणका : १३७९ वाहने केली जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कारोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र यानंतरही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने जिल्हा वाहतूक पोलिसांनी २३ मार्च ते १० मे पर्यंत ९ हजार ७८ वाहन चालकांना दंड आकारून त्यांच्याकडून १८ लाख ६७ हजार ८०० रूपये दंड ठोठावून वसूलही केला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा कर्फ्यू करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्य सरकाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियमान्वये कारवाई करून दंड वसूल करण्याची मोहीम जिल्हा वाहतूक शाखेने चालविली आहे. विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या अश्या ९ हजार ७८ लोकांना २३ मार्च ते १० मे या काळात दंड करण्यात आला आहे. चारचाकी किंवा दुचाकी वाहन चालक रस्त्यावर फिरू नयेत म्हणून पोलिसांनी कायद्याची कडक अमंलबजावणी सुरू केली आहे. कारण नसताना एखादा व्यक्ती रस्त्यावर आढळला व पोलिसांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्या वाहन चालकाला थांबवून त्याच्या वाहनात किंवा वाहन चालवितांना कोणत्या ना कोणत्या तृट्या दाखवून पोलीस कारवाई करीत आहेत. लॉकडाऊनमुळे वाहतूक पोलीस आणखीच कडक नियम लावून कारवाई करीत आहे.हे कडक नियम कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचललेले योग्य पाऊल आहे. २३ मार्चपासून कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.दुचाकी, चारचाकी अशा ९ हजार ७८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत १८ लाख ६७ हजार ८०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. लॉकडाऊनचे पालन व्हावे हा एकमेव या मागील उद्देश आहे. रस्त्यावरून येणाºया-जाणाºया प्रत्येक वाहनाची कसून चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. कारण नसताना वाहन रस्त्यावर आले की त्या वाहनाला दंड कसा करायचा याच्याच प्रयत्नात वाहतूक पोलीस दिसत आहेत.हे जरी वाहन चालकांना योग्य वाटत नसले तरी आजघडीला वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणारी ही कारवाई समाजाच्या हिताची आहे. दंडामुळे विनाकारण लोक रस्त्यावर येणार नाहीत आणि कोरोनाच्या लढाईत सर्व जिंकतील हा या मागील उद्देश आहे.कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर सोडली वाहनेकागदपत्रे न बाळगता रस्त्यावर वाहन घेऊन येणाºया १ हजार ३७९ वाहन चालकांवर मोटार वाहन कायदाचे कलम २०७ अंतर्गत कारवाई करून वाहन जप्त केले. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्या वाहनांना सोडण्यात आले.लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल झाले तरी केवळ अत्यावश्यक कामाकरीताच लोकांनी बाहेर पडावे. बाहेर जायचे असेल तर एकाच वेळी सर्व कामे करावीत. विनाकारण घराबाहेर पडू नयेत.- दिनेश तायडे, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा गोंदिया.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसcorona virusकोरोना वायरस बातम्या