शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

कॉपीमुक्त वातावरणात दहावीची परीक्षा अंतिम टप्प्यात

By admin | Updated: March 23, 2015 01:40 IST

परीक्षेदरम्यान चालणाऱ्या कॉपीच्या प्रकारावर आळा बसावा यासाठी शिक्षण विभाग कॉपी मुक्त अभियान राबवित आहे.

काचेवानी : परीक्षेदरम्यान चालणाऱ्या कॉपीच्या प्रकारावर आळा बसावा यासाठी शिक्षण विभाग कॉपी मुक्त अभियान राबवित आहे. या अंतर्गत परीक्षा केंद्रांवर लावण्यात आलेला पोलिसांचा बंदोबस्त तसेच कॉपी न करता परीक्षा देण्याबाबत विद्यार्थी व पालकांत निर्माण झालेली जागृती यामुळेच कॉपीमुक्त वातावरणात बारावीची परीक्षा संपली. आता दहावीची परीक्षा अंतिमटप्यात आली आहे. परीक्षा म्हटली की विद्यार्थीच काय तर त्यांचे पालकही तणावात असतात. यातूनच कॉपीचे प्रकार घडतात. विद्यार्थी कॉपी तर करतात, मात्र कित्येक पालकही या कामात त्यांची साथ देतात. आपल्या पाल्याला कॉपी मिळावी यासाठी कित्येक पालक परीक्षा केंद्रावर सेटींग करीत किंवा बाहेरून कॉपी पोचविण्यासाठी केंद्राबाहेर बसून राहतात. विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालक , नातलग किंवा मित्रमंडळीत अधिक उत्साह दिसून येत होता. परिणामी परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरविण्यासाठी एकच गर्दी दिसून येत होती. मात्र दोन दशकापूर्वीचे हे चित्र आता पालटले आहे. स्पर्धात्मक दृष्टिकोन, परीक्षेविषयक शासनाचे दिवसेंदिवस कडक धोरण, सुलभ शिक्षण प्रणाली, शासनाद्वारे पाठ्यक्रम पुस्तकांचा पुरवठा, विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे आणि शिक्षकांसह परीक्षेशी संबंधित संचालन मंडळावर लादलेल्या जबाबदाऱ्या, शिवाय परीक्षा केंद्राबाहेर लावण्यात येत असलेला पोलिसांचा चोख बंदोबस्त, अशी अनेक कारणे कॉपी मुक्त परीक्षा अभियानाच्या यशस्वितेसाठी पोषक ठरत आहेत. शिक्षण विभागाने परीक्षा सोप्या व सुलभ करण्याकरिता प्रात्यक्षिकांवर २० गुण दिले. प्रश्नपत्रिकेत सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला. विद्यार्थ्यांना आपण उत्तीर्ण होणारच अशी भावना निर्माण झाली असून त्यातूनच अभ्यास करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. तर दहावी आणि बारावी परीक्षेत कॉपी करण्यात आली तर त्यापुढील अभ्यासक्रमात यश संपादन करता येणार नाही. अर्थात दहावी आणि बारावी परीक्षेत कॉपी करून भरपूर टक्केवारी मिळविली, त्याला काहीच अर्थ राहणार नाही, अशी समजूत विद्यार्थी व पालकांत येवू लागली. त्यामुळेच पालक पाल्यांना मेहनत करून मिळेल तेवढी टक्केवारी पटकाविण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. याच कारणामुळे आजघडीला कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीतपणे पार पडल्याचे दिसून येते. बारावीच्या परीक्षा नुकत्यात संपल्या. मात्र या परीक्षेदरम्यानही परीक्षा केंद्राबाहेर पूर्वी राहत होती तशी गर्दी दिसून आली नाही. तर दहावीच्या परीक्षाही सुरळीतपणे सुरू आहे. काही प्रमाणात कॉपीचे प्रकार चालतात. त्यावर बाहेरून पोलिसांची लाठी तर आतमध्ये भरारी पथकाची कारवाई आळा घालतेच. मात्र परीक्षा केंद्राची पाहणी केल्यावर शांत व कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)