शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या टेबलावर मांडले कुजलेल्या धानाचे भारे

By admin | Updated: November 9, 2015 05:10 IST

आमदार संजय पुराम यांनी बोलाविलेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी हल्ला चढवून थेट त्यांच्या

सालेकसा : आमदार संजय पुराम यांनी बोलाविलेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी हल्ला चढवून थेट त्यांच्या टेबलावरच कुजलेल्या धानाचे भारे मांडले. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी रेटून धरत शेतकऱ्यांनी पंचायत समितीचे आवार दणाणून सोडले. यावर आमदारांनी कृषीमंत्र्यांशी भेट घेऊन त्यांना परिस्थिती सांगणार असल्याचे सांगून वेळ मारून नेली.तालुक्यात धानपिकांवर रोगांचा एवढा प्रादुर्भाव झाला की, सर्वत्र धानाचे पीक नष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना धान स्वरूपात काहीच हाती येणार नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्या जनावरांसाठी तणसही निघणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांसह जनावरांच्या चाऱ्याची चिंताही सतावू लागली आहे. याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूल व कृषी विभागासह स्थानिक लोकप्रतिनिधींसह आमदार व खासदारांपर्यंत समस्यांचे निवेदन सादर केले. यात शेतकऱ्यांना कुठेही मदतीची हमी देण्यात आली नाही. धानपीक नष्ट झाल्याने शेकडो शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात दिसत आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर लाखे रूपये खर्चून आज त्यांच्या हाती १० टक्केही लागणार नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यात मदतीची हमी नसल्याने काय करू-काय नाही अशी स्थिती असल्याचे शेतकरी बोलत आहेत. शेतकऱ्यांना दिलास देण्यासाठी मागील आठ-दहा दिवसांपासून तहसीलदार प्रशांत सांगळे, पंचायत समिती सभापती हिरालाल फाफनवाडे, कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम, पंचायत समिती कृषी अधिकारी मडावे, जिल्हा परिषद सदस्य लता दोनोडे, पंचायत समिती सदस्य प्रतिभा परिहार, जिल्हा परिषद सदस्य विजय टेकाम, दुर्गा तिराले, समाजकल्याण देवराज वडगाये यांच्यासह इतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी आपापल्या सोयीनुसार तालुक्यात दौरा केला. दौऱ्यात त्यांनी शेतातील पिकांची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतली. मात्र शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यापलीकडे त्यांच्याकडून मदतीची हमी कुणीच दिली नाही. हा सर्व प्रकार सुरू असताना, शनिवारी (दि.७) पंचायत समिती सभागृहात आमदार पुराम यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीबद्दल शेतकऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी आपल्या आमदारांपुढे मांडण्याचे ठरविले. ठरविल्यानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैठकीला उपस्थित महसूल, कृषी, शिक्षण, सिंचन, वनीकरण व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे धडक दिली. याप्रसंगी शेतकऱ्यांनी शासनाकडून मदतीची मागणी करीत अवघा सभागृह दणाणून सोडला. शेतकऱ्यांच्या या रौद्र रूप पुढे बैठकीतील अन्य कामकाज तर होऊच शकले नाही. (तालुका प्रतिनिधी)आमदारांनी काढले मुंबईचे तिकीट ४शेतकऱ्यांचे रौद्ररूप बघता आढावा बैठकीत उपस्थित अधिकारी आपल्या विभागाचा लोखा-जोखा मांडू शकले नाही. उलट शेतकऱ्यांचे हे प्रदर्शन बघता सर्वच अवाक झाले. चक्क आमदारांच्या टेबलावरच कुजलेल्या धानाचे भारे मांडण्यात आल्याने सर्वच आश्चर्यचकित झाले. शेतकऱ्यांचा गराडा बघता आ. पुराम यांनी योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे आश्वासन देत लगेच कृषिमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईचे तिकीट काढत असल्याचे सांगितले.