शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चुकाऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी उपोषणाची केली तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST

आदिवासी विकास महामंडळाने गोठणगाव, केशोरी, इळदा येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या खरेदी केंद्रामार्फत या वर्षीच्या रब्बी हंगामातील धान व मका पीक सातबारा नोंदीप्रमाणे खरेदी केले होते. खरेदी करण्यास ३ महिन्यांचा कालावधी लोटूनही आदिवासी महामंडळाने चुकारे शेतकºयांना दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील खर्चाचे नियोजन बिघडले. परिणामी त्यांना सावकाराकडून कर्ज घेवून खरीप हंगाम पार पाडावा लागला.

ठळक मुद्देधान व मक्याचे चुकारे अडकून : तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : मागील ३ महिन्यांपासून अडकून असलेले धान व मक्याचे चुकारे पोळा पर्यंत मिळणार असे आश्वासन लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना दिले होते. मात्र पोळा आला असतानाही चुकारे न मिळाल्याने शेतकऱ्यांत रोष व्याप्त आहे. अशात शेतकऱ्यांना आदिवासी विकास महामंडळाच्या विरोधात उपोषणावर नसण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन तसा इशारा दिला आहे.आदिवासी विकास महामंडळाने गोठणगाव, केशोरी, इळदा येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या खरेदी केंद्रामार्फत या वर्षीच्या रब्बी हंगामातील धान व मका पीक सातबारा नोंदीप्रमाणे खरेदी केले होते. खरेदी करण्यास ३ महिन्यांचा कालावधी लोटूनही आदिवासी महामंडळाने चुकारे शेतकऱ्यांना दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील खर्चाचे नियोजन बिघडले. परिणामी त्यांना सावकाराकडून कर्ज घेवून खरीप हंगाम पार पाडावा लागला. अडलेले चुकारे आदिवासी महामंडळाकडून त्वरीत मिळावे यासाठी आदिवासी महामंडळाकडे विचारणा करण्यात आली. परंतु महामंडळाच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेवून समस्या मांडली होती.लोकप्रतिनिधींनी पोळा या सणापूर्वी चुकारे मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पोळा आला असूनही शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात शासनाप्रती तीव्र आक्रोष भडकत आहे.आदिवासी महामंडळाने येत्या ८ दिवसांत रब्बी धान व मका पिकाचे चुकारे न दिल्यास या शेतकरी रस्त्यावर उतरुन उपोषणावर बसण्याचा इशारा विनोद पाटील गहाणे, दिनेश पाटील रहांगडाले, शिवसेना तालुका संघटक चेतन दहीकर व शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदनातून दिला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी