वन कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

By Admin | Updated: December 6, 2015 01:53 IST2015-12-06T01:53:18+5:302015-12-06T01:53:18+5:30

तिरोडा वनविभाग कार्यालय शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. वन्यप्राणी शेतीचे नुकसना करतात. त्यांना नुकसान भरपाई न देता त्यांची दिशाभूल करतात.

Farmers are misguided by forest employees | वन कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

वन कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

सुकडी-डाकराम : तिरोडा वनविभाग कार्यालय शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. वन्यप्राणी शेतीचे नुकसना करतात. त्यांना नुकसान भरपाई न देता त्यांची दिशाभूल करतात.
शेतातील पिकांचे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. त्यांनी दखल घ्यावी म्हणून शेतकरी वनविभागाकडे जातात.पण कार्यरत कर्मचारी त्यांना सल्ला न देता त्याची दिशाभूल करतात. शेतकरी नुकसान झाल्याने ज्या विभागात अर्ज सादर करतो. त्या शेतकऱ्यांना अर्जावर चार रुपयांची कोर्टाची तिकीट लावण्यास सांगतात. त्या जमिनीच्या ७/१२, ८ अ, नकाशा, सीमांकन, आधारकार्ड, बँकेचे पुस्तक अशा विशेष कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सांगून त्यांना कार्यालयाकडून परत पाठवतात. कागदांच्या पूर्ततेसाठी पायपीट करून कार्यालयात जमा करतो. असे आणखी संपूर्ण अर्ज आॅनलाईन करून आल्याचे सांगतो. या भागातील शेतकरी अशिक्षीत असल्याने त्यांना आॅनलाईन समजत नाही. परिणामी तो त्या वनविभागाच्या कार्यालयात चार-पाच वेया चकरा मारतो. वनविभागास कर्मचाऱ्यांच्या त्रासामुळे नुकसानीचा अर्ज न देता आपल्या घरी येतो. एकाद्याने अर्ज दिला तर अर्ज दिल्यानंतर त्याच्या रेंजमधील कर्मचारी माहिती मिळूनही पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या शेतात जात नाही. (वार्ताहर)

Web Title: Farmers are misguided by forest employees