शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल

By admin | Updated: March 23, 2015 01:41 IST

मागील १५ दिवसांपासून येत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे तीनतेरा करुन हरभरा, लाखोळी, गहू, जवस, भाजीपाल्यांचे नुकसान केले आहे.

परसवाडा : मागील १५ दिवसांपासून येत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे तीनतेरा करुन हरभरा, लाखोळी, गहू, जवस, भाजीपाल्यांचे नुकसान केले आहे. उन्हाळी धानाचे पऱ्हेही धोक्यात आले आहेत. शिवाय पाहणी न करता सर्वेक्षणाची यादी तयार केली जात असल्याचा प्रकार सुरू असल्याने शेतकऱ्यांना काय मदत मिळणार, याबाबत शंकाच आहे. यातूनच शेतकरी हवालदिल झाला आहे. तिरोडा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने प्रधान सचिव मीना, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यासह लोकप्रतिनिधीनींही पाहणी करून नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले. पण अधिकाऱ्यांच्या आदेशाला काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी कचरापेटी दाखवित कार्यालय, पानटपरी व सरपंचांच्या घरी बसूनच यादी तयार करुन सर्वेक्षण झाल्याचे सांगितल्याचे दिसून येत आहे. गावातील किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले याची यादी जाहीर करण्यात आलीच नाही व यादी गुलदस्त्यात ठेवली आहे. तिरोडा तालुक्यात सर्वाधिक लाखोळी पीक घेतले जाते. पण काही ठिकाणी त्यांचे सर्वेक्षण व पंचनामा केलाच नसून लाखोळीचे नुकसान लिहिण्यात येऊ नये, असे शासन व अधिकाऱ्यांचे आदेश असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. सततच्या पावसाने उन्हाळी धानपिकांवर रोग लागत असल्याने पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी कर्ज घेऊन पीक वाचवित आहेत. एकीकडे शासन शेतकऱ्यांची पाठ थोपटत असताना दुसरीकडे जिल्हा बँकेकडून सक्तीची वसुली सुरू आहे. शेतकऱ्यांच्या घरातील वस्तुंची जप्ती करुन अधिकारी शेतकऱ्यांना धमकावित आहेत.दुसरीकडे संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या पैशावर विदेशवारी करुन आले आहेत. याची चौकशी होणे आवश्यक असून शेतकऱ्यांनी त्वरित मदतीची मागणी केली आहे. (वार्ताहर)