शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला दुप्पट दाम देण्याचे आश्वासन फोल

By admin | Updated: May 8, 2015 01:02 IST

सन २०१४ च्या निवडणुकीत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा दुप्पट दाम देण्याचे आश्वासन देऊन भाजपच्या सरकारने सत्ता हातात घेतली.

शेंडा (कोयलारी) : सन २०१४ च्या निवडणुकीत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा दुप्पट दाम देण्याचे आश्वासन देऊन भाजपच्या सरकारने सत्ता हातात घेतली. परंतु सत्तेवर येताच घुमजाव केले. उलट त्यांना आर्थिक संकटाच्या कचाट्यात ढकलून अन्याय केल्याचा आरोप शेंडा परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे.पावसाळी धान पिकाचे मोठे नुकसान होऊन शेतकरी हतबल झाले. त्याची उणीव भरुन काढण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात रबी धान पिकाची लागवड करण्यात आली. सध्या धान पिकाची कापणी सुरू असून मळणीसुद्धा सुरू आहे. शासनाने हमी भाव धान खरेदी केंद्र उघडण्याची परवानगी आजपावेतो दिली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना अत्यल्प दरात धान विकावे लागत आहे. हे दर उत्पादन खर्चाच्या निम्मे असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. धानाचे पीक घेताना शेतकऱ्यांना प्रति एकर पंधरा हजार रुपये खर्च करावा लागतो. यामध्ये लागवडीसाठी ट्रॅक्टर खर्च, बियाणे, पेरणी, रोवणी, निंदण, रासायनिक खत, कीटकनाशक, औषध फवारणीपासून मळणीपर्यंतचा खर्च जोडलेला आहे. परंतु शेतकऱ्यांची व त्यांच्या कुटुंबातील काम करणाऱ्या महिलांची रोजी जोडली नाही. असे असताना सध्या धान प्रतिक्विंटल नऊशे ते एक हजार रुपये भावाने धान विकावे लागत आहे, ते उत्पादन खर्चाच्या निम्मे आहे.महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना शेतकऱ्यांना सिंचनाची सोय म्हणून मोठ्या प्रमाणात विहिरी, दुष्काळात मदत व धानाला बोनस देऊन शेतकऱ्यांचे हित जोपासले. परंतु सन २०१४ मध्ये सत्ता परिवर्तन होवून भाजपचे सरकार सत्तेवर येताच शेतकरी विरोधी धोरण स्वीकारुन त्यांच्यावर अन्याय करीत असल्याचा आरोप होत आहे. नेहमी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा राहणाऱ्या या जिल्ह्याच्या दबंग नेत्याला परिर्वतनाचा लाटेत पराभव पत्करावा लागला. याचा पश्चाताप शेतकरी करीत आहेत. त्याचप्रमाणे स्वत:ला भूमिपूत्र म्हणवून घेणारे खासदार निवडणूक पूर्व काळापासून दिसेनासे झाल्याने जनतेत रोष आहे.आपला देश कृषीप्रधान आहे. सव्वा कोटी जनतेच्या पोटाची काळजी करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती फारच बिकट आहे. त्यांच्या हिताच्या दृष्टीने उत्पादन खर्चावर भाव मिळणे अपेक्षित आहे. शासनाने तातडीने हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना केली आहे. (वार्ताहर)