शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

ेसत्ताधाऱ्यांचे अपयश जनतेपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: December 29, 2014 23:45 IST

केंद्रात व राज्यात आपली सत्ता नाही. परंतु कार्यकर्त्यांनी निराश न होता पक्षाची कामे करत रहावी व निवडणुकीच्यावेळी विरोधकांनी दाखविलेल्या ‘अच्छे दिन’चे स्वप्न पुर्ण होताहेत काय,

पटेलांचे आवाहन : जिल्हा कार्यकर्ता बैठकीला मार्गदर्शनगोंदिया : केंद्रात व राज्यात आपली सत्ता नाही. परंतु कार्यकर्त्यांनी निराश न होता पक्षाची कामे करत रहावी व निवडणुकीच्यावेळी विरोधकांनी दाखविलेल्या ‘अच्छे दिन’चे स्वप्न पुर्ण होताहेत काय, काळा पैसा परत आणून जनतेच्या खात्यात जमा झाला का, असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना करून त्यांची नामुष्की जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. येथील विशाल लॉनमध्ये पक्षाच्या वतीने नुकतीच कार्यकर्ता बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रफुल्ल पटेल होते. यावेळी आमदार राजेंद्र जैन, पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, भंडारा जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, देवेंद्रनाथ चौबे, विजय राणे, गंगाधर परशुरामकर, रमेश ताराम, अशोक गुप्ता, मनोहर चंद्रीकापुरे, कुंदन कटारे, शिव शर्मा, दामोदर अग्रवाल, अशोक शहारे, जगदिश बहेकार, नरेंद्र तुरकर आदी उपस्थित होते. पक्ष मागील अनेक वर्षापासून सत्तेवर असल्याने कार्यकर्त्यांना विरोध कसा करावा याची माहिती नाही. निवडणुका येतात व जातात. कार्यकर्त्यांनी परिसरातील जनतेच्या समस्या जाणून घ्याव्यात व सत्ताधाऱ्यांच्या समक्ष विविध मुद्दे उचलून धरले पाहिजे. मागण्या पूर्ण करून घेतल्या पाहिजे. यातून पक्ष मोठा होईल व नवीन कार्यकर्ते जोडले जातील, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले. जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन बबलू कटरे यांनी केले तर आभार शिव शर्मा यांनी मानले.कृषी अधिकाऱ्याची मागणीमुंडीकोटा : या गावी कृषी मंडळ कार्यालय आहे. पण मागील एक वर्षापासून कृषी मंडळ अधिकारी नाही. याठिकाणी अधिकारी होते. पण त्यांची बदली झाल्यामुळे या ठिकाणी नवीन अधिकारी रुजू झालेच नाही. तसेच या कार्यालयात एक कृषी पर्यवेक्षक होते, पण ते सेवानिवृत्त झालेत. पण ती जागा रिक्त पडलेली आहे. त्यामुळे या कार्यालयात एकच कृषी पर्यवेक्षक व ११ कृषी सहायक कार्यरत आहेत. एकच कृषी पर्यवेक्षक असल्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. या ठिकाणी अधिकारी नसल्यामुळे या कार्यातील सर्वच कर्मचारी बाहेर गावावरून ये-जा करतात. तिरोडा येथे सभा असल्यास सर्वच कर्मचारी जातात.