शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांना शुध्द व मुबलक पाणी मिळावे

By admin | Updated: August 10, 2014 23:05 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी करीत असताना लोकवर्गणी, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता आणि हागणदारीच्या अटीमुळे बऱ्याचशा पाणी पुरवठा योजना रखडलेल्या होत्या.

गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी करीत असताना लोकवर्गणी, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता आणि हागणदारीच्या अटीमुळे बऱ्याचशा पाणी पुरवठा योजना रखडलेल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असे. मात्र शासनस्तरावरून गेल्या वर्षभरामध्ये जारी केलेल्या धोरणात्मक सुधारणेमुळे आता सर्व ग्रामीण जनतेस शुध्द व मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी मिळेल व योजना लवकर पूर्ण होतील असे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे प्रभारी कार्यकारी अभियंता ग्रापापू यू.एन. वाकोडीकर म्हणाले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. सभागृहात आयोजित राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायतीची एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेत विभागीय भारत निर्माण कक्ष कार्यालयातून सावरकर, उपविभागीय अभियंता तुरकर, उपविभागीय अभियंता जितेद्र चव्हाण, उपविभागीय अभियंता एस.आर. शर्मा यांच्यासह वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा काझी, सर्व ग्रामपंचायतीचे ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सचिव, शाखा व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये सुधारित शासन निर्णयाबाबत सविस्तर माहिती प्रभारी उपकार्यकारी अभियंता एस.आर.शर्मा यांनी दिली. काझी यांनी भूजलाची पाण्याची पातळी व पाणी अडवा पाणी जिरवाबाबत ताहिती दिली. जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ज्ञ मुकेश त्रिपाठी यांनी पाणी गुणवत्तेसंदर्भात व पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घ्यावयाची काळजीबाबत माहिती दिली. सोबत पाणी हे जीवन आहे. त्याचा विनास करू नका असे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन शाखा अभियंता प्रिती माकोडे यांनी तर आभार राजेश उखळकर यांनी मानले. कार्यशाळेला तृप्ती साकुरे, व्ही.डी. मेश्राम, दीपाली साखरे व साधना डुभरे यासह सर्व गटसमन्वयक गट संसाधन केंद्र व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांंनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)