शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक महिन्यात राबवू अभियान

By admin | Updated: November 6, 2014 01:58 IST

शासनाने स्वच्छ ग्राम-स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. तसेच तिरोडा तालुक्याच्या चिरेखनी गावात जगनाबाठू वाघदेव बाबा मंदिराच्या जिर्णोद्धाराचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे.

गोंदिया : शासनाने स्वच्छ ग्राम-स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. तसेच तिरोडा तालुक्याच्या चिरेखनी गावात जगनाबाठू वाघदेव बाबा मंदिराच्या जिर्णोद्धाराचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. त्यानिमित्ताने चिरेखनी येथे बुधवार ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण गावाची स्वच्छता करण्यात आली. यात संपूर्ण ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.स्वच्छता ही काळाची गरज आहे. स्वच्छता नसेल तर गावात रोगराईचे प्रमाण वाढते. आपले घर, परिसर व गाव नेहमी स्वच्छ ठेवावे. स्वच्छतेचे महत्त्व जाणून स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशानेच चिरेखनी गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सहभागी झालेल्या संपूर्ण ग्रामस्थांनी चिरेखनी गावात प्रत्येक महिन्यातून एकदा संपूर्ण स्वच्छ करण्याचा निर्धार व्यक्त केला. या स्वच्छता अभियानाची सुरूवात चिरेखनीच्या हनुमान मंदिर चौकातून करण्यात आली. सोबतच एक ट्रॅक्टर-ट्रॉली ठेवण्यात आली. यानंतर वार्ड-३ मधून संपूर्ण साफसफाई करण्यात आली. जमा झालेला केरकचरा ट्रॉलीमध्ये घालून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. यानंतर चिरेखनी ग्रामपंचायत ते जि.प. पूर्व माध्यमिक शाळेपर्यंतच्या रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. यात वार्ड-२ मधील नालंदा बुद्ध विहार व शिवमंदिर परिसरातील केरकचरा जमा करून ट्रालीत घालण्यात आला. गावाच्या मधातील वार्ड-१ चीसुद्धा साफसफाई करण्यात आली. यानंतर जमा झालेला गावातील संपूर्ण केरकचरा व घाण ट्रॅक्टर-ट्रॉलीने गावाबाहरे दूर अंतरावर नेवून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.चिरेखनी गावातील प्रत्येक नाली व प्रत्येक गल्ली स्वच्छ असावी, गावात डास असू नये, गावात आजार पसरू नये, संपूर्ण गावात आरोग्य, शांतता व सुव्यवस्था नांदावी यासाठी दर महिन्यात ग्रामपंचायत प्रशासन नेहमीच पुढाकार घेईल व संपूर्ण गाव घाणमुक्त करण्यासाठी नेहमीच प्रयत्न सुरू राहतील. त्यासाठी संपूर्ण ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे सरपंच जगन्नाथ पारधी यांनी सांगितले. कृउबासचे संचालक रमेश टेंभरे यांनी गावात दर महिन्यात सदर अभियान राबवून नवीन आदर्श निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला. या स्वच्छता अभियानात प्रामुख्याने तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश टेंभरे, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र कोटांगले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवचरण शहारे, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष देवचंद रिनाईत, सरपंच जगन्नाथ पारधी, माजी ग्रा.पं. सदस्य भोजलाल पटले, डॉ. मेखचंद शहारे, गोपीचंद रिनाईत, गेंदलाल पारधी, माजी सरपंच उमेंद्र पारधी, इंदल बिसेन, पंतूलाल पारधी, खेमू रिनाईत, भागवत पारधी, उदेलाल पारधी, उपसरपंच सोनू पारधी, गणेश पारधी, छगणलाल पारधी, भावराव कोटांगले, घनश्याम जांभूळकर आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)