शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
4
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
5
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
6
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
7
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
8
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
9
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
10
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
11
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
12
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
13
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
14
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
15
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
16
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
17
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
18
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
19
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
20
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस

चौथ्यांदा मुदतवाढ तरीही प्रतिसाद थंड ! अजूनही निम्म्याहून अधिक वाहने 'एचएसआरपी'विना, डेडलाईन केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:24 IST

Gondia : सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (एचएसआरपी) बसवण्याची अंतिम मुदत केवळ २० दिवसांवर येऊन ठेपली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (एचएसआरपी) बसवण्याची अंतिम मुदत केवळ २० दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, जिल्ह्यातील तब्बल ५२ टक्क्यांहून अधिक जुन्या वाहनांना अद्यापही ही नवी नंबर प्लेट बसविण्यात आलेली नाही. चौथ्यांदा देऊनही मुदतवाढ प्रतिसाद थंड असल्याने १ डिसेंबरपासून जवळपास १ लाख वाहने कारवाईच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे. एचएसआरपी बसवण्याची मोहीम १ जानेवारी २०२५ पासून सुरू झाली. सुरुवातीला ३१ मार्च, नंतर ३० जून, १५ ऑगस्ट आणि आता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली, तेव्हा एचएसआरपी बसविल्याचे प्रमाण जवळपास ३० टक्के होते. परंतु, त्यानंतरच्या तीन महिन्यांच्या कालावधीत जवळपास ३० टक्के वाहनांनाच या प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत. आरटीओ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यात सन २०१९ पूर्वीची १ लाख ८० हजार वाहने आहेत. यापैकी आतापर्यंत ही नंबर प्लेट लावण्यासाठी ९५०२४ वाहनधारकांनी यासाठी नोंदणी केली आहे. तर ६९५४८ वाहनांना ही नंबर प्लेट लावण्यात आली आहे.

जवळपास १ लाख वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लागणे शिल्लक आहे. त्यामुळे २० दिवसांची मुदत आणि ५२ टक्के वाहनांना एचएसआरपी नसल्याने परिवहन विभागाची चिंता वाढली आहे. त्यामुळे या वाहनचालकांना आता कारवाईला सामोरे जाण्याची शक्यता बळावली आहे.

१५०० रुपये दंड

१ डिसेंबरनंतर कोणतीही मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर पहिल्या गुन्ह्यामध्ये ५०० रुपये, तर दुसऱ्या गुन्ह्यात १ हजार ५०० रुपये दंडाची तरतूद आहे.

१ डिसेंबरपासून कारवाईची टांगती तलवार

  • वाहन सुरक्षेसाठी एचएसआरपी अनिवार्य आहे.
  • यामध्ये वाहनाचा क्रमांक लेझर तंत्रज्ञानाने प्रिंट केलेला असतो आणि 'नॉन-रिमुव्हेबल स्नॅप लॉक्स' वापरलेले असतात.
  • ज्यामुळे ही प्लेट काढणे किंवा 3 बदलणे अत्यंत कठीण होते.
  • ३० नोव्हेंबरची मुदत संपल्यानंतर १ डिसेंबरपासून आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई सुरू केली जाणार आहे.
  • त्यामुळे वाहनचालकांनी मुदतीपूर्वीही नंबर प्लेट लावून घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी कळविले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Low Response Despite Extension: Many Vehicles Lack HSRP; Deadline Looms!

Web Summary : Gondia faces low compliance with High-Security Registration Plate (HSRP) installation despite multiple extensions. Over 52% of older vehicles still lack the plates, risking fines starting December 1st. About 1 lakh vehicles may face action. Penalties range from ₹500 to ₹1500.
टॅग्स :gondiya-acगोंदियाTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस