शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

रिडिंग न घेताच शेतकऱ्यांना वीज बिल

By admin | Updated: February 8, 2015 23:35 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरातील शेतकऱ्यांवर रिडिंग न घेताच अधिकचे विद्युत बिल पाठविण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे महावितरणच्या कार्यप्रणालीवर चिड व्यक्त केली जात आहे.

शेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरातील शेतकऱ्यांवर रिडिंग न घेताच अधिकचे विद्युत बिल पाठविण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे महावितरणच्या कार्यप्रणालीवर चिड व्यक्त केली जात आहे. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत राहणाऱ्या विद्युत विभागाने शेतातील मोटारपंप धारकांना पाच हजारापासून दहा हजारापर्यंतचे बिल रिडिंग न घेताच पाठविले आहे. यामध्ये ९० टक्के शेतकरी नियमित बिल भरणारे आहेत. सध्या या परिसरात रबी पिकांचे रोवणे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. त्याचप्रमाणे ९० टक्के शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय म्हणून विहिरी व मोटार पंप आहेत. रबी व हंगामी पिकांचे उत्पादन घेणार शेतकरी नियमित बिल भरत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते. विद्युत विभागातील कर्मचारी नियमित मोटर पंपची रिडिंग न घेताच उंटावरुन शेळ्या हाकण्याचे काम करतात. या चुकीच्या बिलाची तक्रार देण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना बिल कमी न करता तुम्हाला पूर्ण बिल भरावेच लागणार अन्यथा वीज कनेक्शन कापण्यात येईल, अशी दमदाटी देऊन आल्यापावली परत पाठवण्यात येते, असे शेतकऱ्यांनी बोलून दखवले.शेतकऱ्यांवर अमाप बिल पाठविण्याची ही पहिलीच वेळ नाही तर शेतकऱ्यांची नेहमीची ओरड आहे. परंतु वीज वितरण कंपनीचे अधिकारी या गंभीर प्रकाराकडे लक्ष न देता अन्यायच करतात, असा आरोपही होत आहे.दरवर्षीच्या दुष्काळामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर कोणताही लोकप्रतिनिधी धडाळीने लढताना दिसत नाही. उलट घूमजावची भूमिका घेताना निदर्शनास येत आहे. अशावेळी शेतकऱ्यांचा वाली कोण, हा प्रश्न पुढे येत आहे. नेहमी अन्याय सहन करणाऱ्या शेतकऱ्यांची हिंमत दिवसेंदिवस खालावत आहे. या परिसरातील शेतकऱ्यांच्या मोटार पंपची रिडिंग घेवूनच बिल पाठवावे अन्यथा आलेले बिल भरणार नाही व जोडणीसुद्धा कापू देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. (वार्ताहर)