शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अठरा दिवसांपासून रुग्णवाहिकेची चाके थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST

प्राप्त माहितीनुसार सन २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात भोपाळ येथील एका कंपनी अंतर्गत रुगण्वाहिका चालकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली. त्यांनी वेतनासह इतर मागण्यांना घेऊन २४ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देचालकांचे काम बंद आंदोलन : प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी/डाकराम : मागील अठरा दिवसांपासून कंत्राटी रुग्णवाहिका चालकांनी त्यांच्या मागण्यांना घेऊन कामबंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेची चाके थांबली आहे. या आंदोलनाची अद्यापही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत आहे.प्राप्त माहितीनुसार सन २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात भोपाळ येथील एका कंपनी अंतर्गत रुगण्वाहिका चालकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली. त्यांनी वेतनासह इतर मागण्यांना घेऊन २४ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. परिणामी आठही तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका सेवा ठप्प पडली आहे. त्यांच्या आंदोलनाला अठरा दिवसांचा कालावधी लोटूनही याची दखल आरोग्य व जिल्हा प्रशासनाने घेतली नाही. परिणामी याचा फटका ग्रामीण भागातील रुग्णांना सहन करावा लागत आहे.तिरोडा तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.सुकडी/डाकराम, वडेगाव, मुंडीकोटा, इंदोरा बुजरुक या चार प्राथमिक केंद्रामध्ये प्रत्येकी १ रुग्णवाहिका आहे. उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे दोन रुग्णवाहीका आहेत. तर तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे एक रुग्णवाहीका आहे. एकूण सात रुग्णवाहीका तिरोडा तालुक्यात आहे. रुग्णवाहिका चालकांच्या आंदोलनामुळे रुग्णवाहिका सेवा ठप्प पडली असून यासाठी कुठलीच पर्यायी व्यवस्था आरोग्य विभागाने केली नाही. परिणामी रुग्णांना भरती करण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांना आर्थिक भूर्दंंड सहन करावा लागत आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशात त्वरीत एखाद्या रुग्णाला दाखल करायचे असल्यास रुग्णवाहिका सेवा बंद असल्याने मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यानंतरही आरोग्य प्रशासन बिनधास्त असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी संर्पक साधला असता तो होऊ शकला नाही.

टॅग्स :Healthआरोग्य