शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात ५ जण आले परदेशातून, तपासणीत सर्वच आले कोरोना निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:00 IST

मागील महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात पाच जण हे विदेशातून परतले असून यात लंडनहून परतलेल्या दोन जणांचा आणि अमेरिकाहून आलेल्या तीन जणांचा समावेश आहे. या पाचही जणांची आरटीपीसीआर चाचणी आरोग्य विभागाकडून करण्यात करण्यात आली. यात या पाचही जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. विदेशातून जिल्ह्यात आल्यानंतर त्याची माहिती आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाकडून घेतली जातेय दक्षता : विदेशातून येणाऱ्यांवर करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया  : ब्रिटेनमध्ये नव्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. यामुळे देशभरात पुन्हा खळबळ उडाली आहे. नव्या कोरोनाचा संसर्ग देशात वाढू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. ब्रिटनसह इतर देशातून येणाऱ्या नागरिकांची विमानतळ आणि जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे. मागील महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात पाच जण हे विदेशातून परतले असून यात लंडनहून परतलेल्या दोन जणांचा आणि अमेरिकाहून आलेल्या तीन जणांचा समावेश आहे. या पाचही जणांची आरटीपीसीआर चाचणी आरोग्य विभागाकडून करण्यात करण्यात आली. यात या पाचही जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. विदेशातून जिल्ह्यात आल्यानंतर त्याची माहिती आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय ब्रिटनमधून येणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे. तसेच त्यांची चाचणी करुन आणि लक्षणे नसल्याची खात्री करुनच त्यांना घरी जाण्याची परवानगी आरोग्य विभागाकडून दिली जात आहे. 

स्वतंत्र क्वारंटाईन कक्षब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. या देशातून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करुन त्यांना तंत्रनिकेतन विद्यालयात तयार केलेल्या क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे.- डाँ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया. 

एप्रिलपासून विदेशातून एकूण कितीजण आले ७५४ जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत विदेशातून एकूण ७५४ जण परतले आहेत. यात सर्वाधिक नागरिक दुबई येथील आहे. बरेच जण दुबई येथे रोजगारासाठी गेले होते. मात्र कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर हे नागरिक आपल्या स्वगृही परतले आहेत. तर काही नागरिक इतर देशातून परतल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. 

विदेशातून येणाऱ्यांची तपासणी कशी होते?कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून विदेशातून जिल्ह्यात येणाऱ्यांना याची माहिती जिल्हा प्रशासनाने देणे अनिवार्य आहे. यानंतर या नागरिकांची मेडिकलमध्ये आरटीपीसीआर चाचणी केली जाते. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना १४ दिवस शासकीय क्वारंटाईन कक्षात आरोग्य विभागाच्या निदर्शनाखाली ठेवले जात आहे. 

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या