अवकाळी पावसामुळे मिरचीच्या पिकाला फटका

By Admin | Updated: January 7, 2015 22:56 IST2015-01-07T22:56:02+5:302015-01-07T22:56:02+5:30

अर्जुनी-मोरगाव तालुक्यांतर्गत केशोरी परिसर हा मिरची पिकासाठी जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात प्रसिद्ध आहे. येथील मिरची अमेरिकासारख्या देशात सुद्धा जावू लागली आहे. मात्र गेल्या आठवड्यात

Due to the sudden rain, chilli crush the crop | अवकाळी पावसामुळे मिरचीच्या पिकाला फटका

अवकाळी पावसामुळे मिरचीच्या पिकाला फटका

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यांतर्गत केशोरी परिसर हा मिरची पिकासाठी जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात प्रसिद्ध आहे. येथील मिरची अमेरिकासारख्या देशात सुद्धा जावू लागली आहे. मात्र गेल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे मिरची पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र परिसरात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले.
या परिसरात धान पिकांवर मोठ्या प्रमाणात मिरचीचे पिक घेतल्या जाते. गेल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे मिरचीचे झाडावरील आलेला फुलोर गळून पडला. जोमात आलेल्या मिरचीच्या झाडावरील फुलोरा नाहीसा झाला आहे. त्याच बरोबरच बुरशी जन्य रोगांचा प्रार्दुभाव वाढल्याचे उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. मिरची पिकाची पाणे सुद्धा पिवळी होऊन गळू लागली आहेत. यामुळे मिरचीच्या उत्पन्नात घट येणार असल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
केशोरी आणि परिसरात मिरची पिक हे प्रमुख पिक असून मिरची रोपांच्या लागवडीपासून मिरची उत्पादक शेतकरी मिरची पिकाचे उत्पन्न चांगले येण्यासाठी अत्यंत मेहनतीने कष्ट करीत असतो. परंतु वेळोवळी येणाऱ्या ढकाळ वातावरणामुळे मिरची पिकाचे सतत नुकसान होत असल्याने मिरची उत्पन्नात घट होण्यची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था मंभीर झाली आहे. मिरची पिकासाठी लागलेली लागत सुद्धा निघणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे मिरची उत्पादकांचे कंबरडे मोरले आहेत. मिरची पिकाचे कितीही नुकसान झाले तरी शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे. नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसामुळे मिरची पिकाचे झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाने सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांनी आर्थिक मदत द्यावी अशी मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Due to the sudden rain, chilli crush the crop