शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त यादीतून वगळल्याने विकासनिधीला कात्री

By admin | Updated: December 29, 2014 01:42 IST

राज्यात सत्तारूढ झालेल्या सरकारने जिल्ह्यातील चार तालुके नक्षलग्रस्तांच्या यादीतून वगळले. यामुळे जिल्ह्याला केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनेक विकास योजनांच्या निधीपासून वंचित राहावे लागणार आहे,

गोंदिया : राज्यात सत्तारूढ झालेल्या सरकारने जिल्ह्यातील चार तालुके नक्षलग्रस्तांच्या यादीतून वगळले. यामुळे जिल्ह्याला केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनेक विकास योजनांच्या निधीपासून वंचित राहावे लागणार आहे, अशी खंत खा.प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात पत्रकारांशी बोलताना खा.पटेल यांनी जिल्ह्यातील अनेक कामांच्या प्रगतीला राज्य व केंद्र सरकारकडून कशी खिळ बसत आहे याचे विवेचन केले. गेल्यावर्षी आपले सरकार असताना अशाच पद्धतीने काही तालुके नक्षलग्रस्तांच्या यादीतून वगळण्यात आले होते. जिल्हा नक्षलग्रस्त असणे ही काही भूषणावह बाब निश्चितच नाही. पण मागास जिल्ह्यांना या निमित्ताने मिळणाऱ्या केंद्र सरकारच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागू नये, येथे काम करण्यास इच्छुक नसणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना या निमित्ताने मिळणाऱ्या प्रोत्साहन भत्त्यामधून त्यांना येथे काम करण्यास प्रवृत्त करावे ही भूमिका ठेवून मी सरकारदरबारी शब्द टाकला. आ.राजेंद्र जैन यांच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली आणि पुन्हा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना नक्षलग्रस्तांच्या यादीत समाविष्ठ केले होते. मात्र नवीन सरकारने हा निर्णय पुन्हा फिरवून या जिल्ह्याच्या विकासनिधीला कात्री लावली आहे, अशी खंत पटेल यांनी व्यक्त केली.गेल्यावर्षी आम्ही धानाला हमीभावासोबत बोनस मिळून प्रतिक्विंटल १५४० आणि १५१० असा भाव दिला. पण नवीन सरकारकडून केवळ १३६० रुपये हमीभाव दिला जात आहे. त्यातही अनेक ठिकाणी कमी भावात शेतकऱ्यांकडील धान खरेदी करून त्यांची पिळवणूक सुरू आहे. सरकारचे ‘अच्छे दिन’ हेच आहेत का, असा सवाल त्यांनी केला. विद्यमान खासदारांनी (नाना पटोले) धानाला ५००० रुपये हमीभाव देण्याची मागणी संसदेत केली. आम्हालाही असे वाटते. संसदेच्या अधिवेशनात शून्य तासात मी सुद्धा धानाला खर्चावर आधारित योग्य भाव देण्याची मागणी केली होती. पण प्रत्यक्षात सरकारने भ्रमनिरासच केला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. केवळ मोठमोठ्या गोष्टी करून चालणार नाही तर आता करून दाखवावे लागेल, असा टोलाही खा.पटेल यांनी लगावला.यावेळी पटेल यांनी राज्य व केंद्र सरकारमधील राजकीय घडामोडींवरही मनमोकळेपणाने चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी असलेल्या जवळीकबद्दल त्यांना छेडले असता आपले सर्वांशीच चांगले संबंध आहेत, असे सांगून याचा वेगळा अर्थ काढू नये, असे ते म्हणाले. यावेळी आ.राजेंद्र जैन उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)