शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यांच्या संपामुळे महसूल कामे ठप्प

By admin | Updated: April 28, 2016 01:30 IST

महसुलाची सर्वाधिक कामे तलाठ्यांमार्फत केली जातात. शिवाय शेतकरी व विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांसाठी तलाठ्यांकडे जावे लागते.

बेमुदत संप : तलाठी साजे व महसूल मंडळाची पुनर्रचना करागोंदिया : महसुलाची सर्वाधिक कामे तलाठ्यांमार्फत केली जातात. शिवाय शेतकरी व विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांसाठी तलाठ्यांकडे जावे लागते. रेती घाटांवरून होणाऱ्या चोरीवर प्रतिबंध घालण्याचे कामही तलाठी व मंडळ अधिकारी तहसीलदारांच्या नेतृत्वात करतात. मात्र आता तलाठी व मंडळ अधिकारी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेल्याने सर्वच कामे रखडली असून नागरिक अल्पावधीतच त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघ घटक शाखा विदर्भ पटवारी संघ व विदर्भ मंडळ अधिकारी संघ यांच्या नेतृत्वात आपल्या विविध मागण्यांसाठी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी बेमुदत संप पुकारले आहे. मात्र या संपाचा परिणाम ग्रामीण भागात शेतकरी व विद्यार्थ्यांवर पडला आहे. आता आवश्यक प्रमाणपत्रांसाठी कुठे भटकावे, अशी समस्या त्यांच्यासमोर उभी ठाकली आहे. शिवाय रेतीघाटावरून रेतीची चोरी करणाऱ्यांवर कुणाचाही वचक राहिला नाही. अनेक रेतीघाटांवरून खुलेआम चोरी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये तलाठी साजांची व महसूल मंडळांची पुनर्रचना करण्यात यावी, मंडळ अधिकारी कार्यालयाचे भाडे देण्यात यावे, सातबारा संगणकीकरण व ई-फेरफारमधील अडचणी दूर करावे (सॉफ्टवेअर दुरूस्ती, सर्व्हरची स्पीड व नेट कनेक्टिव्हिटीच्या समस्या दूर करावे), तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण द्यावे, अवैध गौण खनिज वसुली कामातून तलाठी संवर्गास वगळावे, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालये बांधून देण्यात यावे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करावा, सरळ सेवेच्या २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवावे, तसेच अंशदायी निवृत्ती वेतन योजनेच्या समस्या सोडवाव्या आदी मागण्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)आंदोलनाची रूपरेषा या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सदर संघटनेने पूर्वीच आंदोलनाची रूपरेखा ठरविली होती. त्यानुसार ११ एप्रिल रोजी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामे केली व महसुलेतर कामे बंद ठेवली. यात संजय गांधी, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, विविध विमा योजना, जात प्रमाणपत्र, जलसंधारण व एमआरईजीएस कामांचा समावेश आहे. १६ एप्रिल रोजी प्रत्येक तसंवर्गास वगळावे,हसील कार्यालयासमोर दुपारी सुट्टीत निदर्शने करण्यात आली. २० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. २१ एप्रिलपासून संगणीकृत कामकाजावर बहिष्कार व डीएससी तहसीलदारांकडे जमा व यानंतर २६ एप्रिलपासून तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या निर्णयानुसार बेमुदत संपावर गेले आहेत.