शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

डॉट्सने क्षयरोग हद्दपार करा

By admin | Updated: March 31, 2016 02:05 IST

क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी होते अशा व्यक्ती क्षयरोगाने ग्रासल्या जाते.

सीईओ गावडेंचे आवाहन : उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा केला गौरवगोंदिया : क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी होते अशा व्यक्ती क्षयरोगाने ग्रासल्या जाते. क्षयरुग्णांना शासनातर्फे देण्यात येणारा औषधोपचार डॉट्स (डायरेक्टली आॅब्झव्हर्ड ट्रीटमेंट विथ शॉर्ट कोर्स किमोथेरपी) देणे रोगमुक्तीसाठी सोयीस्कर झाले आहे. डॉटस उपचार पद्धती म्हणजे क्षयरोग सुधारण्याचे प्रभावी माध्यम आहे आणि औषधोपचार पुर्ण कालावधीपर्यंत घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांनी केले.जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात क्षयरोग जनजागृती मोहिमेचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, उदघाटक म्हणून जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी. कटरे तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. समाज कल्याण सभापती वडगाये, जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, जि.प. महिला व बालकल्याण सभापती विमल नागपुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीश कळमकर उपस्थित होते.सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण सोसायटी व कुंवर तिलिकसिंह जिल्हा सामान्य रु ग्णालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग दिनाची सुरूवात करण्यात आली. यानिमित्ताने प्रभातफेरी, पॉम्प्लेटस वाटप, फ्लेक्स डिस्पले करण्यात आले. प्रभातफेरीला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल परियाल, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.आर.पी. गहलोत, वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.एस. भूमकर, डॉ.विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर, प्रा.सविता बेदरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.बत्रा, दिव्या भगत, जिल्हा क्षयरोग केंद्र गोंदिया येथील सर्व कर्मचारी तसेच दृष्टी बहुउद्देशीय विकास संस्था, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, निसर्ग शाळेच्या प्राचार्या श्रीमती सुखदेवे, प्रशिक्षणार्थी, राधाबाई निसर्ग शाळेचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.यावेळी जिल्ह्यातील एमडीआर क्षयरोगमुक्त झालेल्या रुग्णांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचासुद्धा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. क्षयरोग जनजागृती मोहिमेकरिता पॉम्पलेटसचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. क्षयरुग्णांना शोधण्याकरिता मान्यवरांच्या उपस्थित शपथ घेण्यात आली. सर्वजण मिळून टीबी संपवूया हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले. गोंदिया शहरात काढण्यात आलेली रॅली शहराच्या विविध मार्गातून भ्रमण होत केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. आर.पी. गहलोत, डॉ. डी. एस. भूमकर, सी.बी. भुजाडे, प्रज्ञा कांबळे, हरीश चिंधालोरे, अमति मंडल, डी.सी. डोंगरवार, पंकज लुतडे, नगरारे, गजभिये, अग्रवाल, विलास राठोड, डी.बी. चौधरी, सिंग, एन.एन. लोणारे, राजू मेश्राम, भोजेंद्र बोपचे, भाजीपाले, रजिवाना शेख, संजय रेवतकर, रामचंद लिल्हारे, संजय भगवतकर, मंजुश्री मेश्राम, अशोक मुडपीलवार, लक्ष्मी उज्जैनवार, तांबे, मधुमटके व लता कांबळे यांनी सहकार्य केले. संचालन पवन वासनिक यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ.विशाल काळे यांनी मानले. कार्यक्रमााला आरोम्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)