शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊन संपल्यानंतरही मुलांना घराबाहेर सोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:27 IST

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. दुसऱ्या लाटेत तरुण ...

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. दुसऱ्या लाटेत तरुण वर्ग सर्वाधिक बाधित झाला होता, तर तिसऱ्या लाटेत लहान बालके अधिक प्रमाणात बाधित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पालकांची काळजी अधिक वाढली असून लाॅकडाऊन संपल्यानंतरही मुलांना घराबाहेर सोडू नका, त्यांची विशेष काळजी घ्या, लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून डाॅक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन शहरातील बालरोग तज्ज्ञांनी केले आहे. गोदिया जिल्ह्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण आढळून आले. त्यात सर्वाधिक तरुणांचा समावेश होता. मृतांचे प्रमाणही वाढले होते. आता दुसरी लाट ओसरू लागली असून, लवकरच तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. पालकांचा जीव की प्राण असलेल्या लहान मुलांना कोरोना होऊ न देणे यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. लाॅकडाऊन संपल्यानंतरही मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नका. काही कामानिमित्त बाहेर गेल्यास विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसल्यास डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेेचे आहे. लहान मुलांना कोरोना झाल्यास त्याच्यासोबत घरातील कुणालातरी रुग्णालयात राहावे लागेल आणि त्यातून पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

.....

लस येईपर्यंत काळजी घ्यायलाच हवी

संभाव्य तिसऱ्या लाटेपर्यंत १८ वर्षांवरील बहुतांश व्यक्तींचे लसीकरण झालेले असेल, तर १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण होणार नाही. त्यामुळे या वयोगटातील बालकांना कोरोनाचा अधिक धोका संभावतो. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर बालकांना एमआयएससी या आजाराची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी लक्षणे दिसताच वेळीच काळजी घेण्याची गरज आहे.

- डॉ. मनीष तिवारी, बालरोगतज्ज्ञ

........

सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे लहान मुलांमध्ये दिसल्यास त्वरित टेस्ट करुन डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलांना गर्दीत घेऊन जाऊ नये. घरात कुणी कोरोनाबाधित असेल तर त्याला लहान मुलांपासून दूर ठेवावे. विशेष करून आईने ही काळजी घ्यावी.

-डाॅ. प्रदीप गुजर, बालरोग तज्ज्ञ

.............

सीजनेबल फ्रुट, भाजीपाला, पाेष्टिक आहार अधिक द्या, बालकांच्या नियमित लसीकरणाकडे लक्ष द्या, तापाची लक्षणे दिसल्यास त्वरित बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या, शक्यतो लहान मुलांना घराबाहेर पडू देऊ नका. व्हिटॅमिन सी, डी अथवा व्हिटॅमिन बी काॅम्प्लेक्स सायरप द्यायला हरकत नाही. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व स्वच्छता राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून बालकांवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

-डाॅ. सुनील देशमुख, बालरोग तज्ज्ञ

.............

येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय ६० आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयात ४० बेडचे विशेष वार्ड बालकांसाठी तयार करण्यात येत आहे. सध्या वॉर्डाचे काम बरेच पूर्ण झाले आहे. आता संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता हे विशेष वॉर्ड तयार केले जात आहे. तसेच औषधसाठा आणि आवश्यक सामुग्री सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अमरिश मोहबे यांनी दिली.

...........

संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत जिल्हा प्रशासन आतापासूनच सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सकांसह शहरातील बालरोग तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यांच्याकडून येणाऱ्या सूचना आणि उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. प्रभावी उपाययोजना केल्या जाणार आहेत.

..........

लहान मुलांमध्ये कोरोनाचे लक्षण काय?

- मोठ्यांमध्ये आढळलेली कोरोनाची लक्षणे साधारणपणे लहान मुलांमध्येही दिसून येतील.

- सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, चिडचिडपणा वाढ, डोळे लाल होणे आदी लक्षणे दिसून येतात.

- तीव्र कोरोना लक्षणांमध्ये छातीतून घरघर आवाज येऊन बाळ सुस्त राहण्याची शक्यता आहे. तसेच ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यास ओठ निळसर पडू शकतात.

........

कोरोनाचा धोका लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आहे. त्यामुळे मोठ्यांनी तातडीने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सुसज्ज करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी २० खाटांचा विशेष वाॅर्ड तयार करण्यात येणार आहे.

-डाॅ. अमरिश मोहबे, जिल्हा शल्य चिकित्सक

...........

कोरोनाचे १८ वर्षांखालील रुग्ण : १४५

१० वर्षांपेक्षा कमी वयाचे रुग्ण : ६५