शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंची योजना पाणी देईना

By admin | Updated: October 9, 2015 02:13 IST

अर्जुनी गावात पाणी पुरवठा योजनेंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प. गोंदियाच्या वतीने ६५ हजार लिटर क्षमतेचे सन २०१३-१४ मध्ये लाखो रूपये खर्चून जलकुंभ तयार करण्यात आले.

ग्रामपंचायतचे दुर्लक्ष : नळ लागले पण पाणी येत नाही, टाकीवर लाखोंचा खर्चविजेंद्र मेश्राम  खातियाअर्जुनी गावात पाणी पुरवठा योजनेंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प. गोंदियाच्या वतीने ६५ हजार लिटर क्षमतेचे सन २०१३-१४ मध्ये लाखो रूपये खर्चून जलकुंभ तयार करण्यात आले. गावात घरोघरी नळांची जोडणीसुद्धा करण्यात आली. मात्र या नळांद्वारे पिण्याचे शुद्ध पाणीच मिळत नसल्याने पिण्याच्या पाण्याची मोठीच समस्या उद्भवली आहे. यात पाईप लाईनची फिटिंगच चुकीची करण्यात आल्याने अनेकांच्या घरी नळांना पाणीच येत नाही. गावात एकूण ३५४ नळ जोडण्या आहेत. आजही अनेक लोक नळ कनेक्शन घेत आहेत. मात्र पाणीच मिळत नसल्याने गावकरी त्रस्त होवून गेले आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी यासाठी शासनाच्या वतीने लाखो रूपये खर्च करून जलकुंभ तयार करण्यात येत आहेत. परंतु पाणी पुरवठा योजनेच्या क्रियान्वयनाबाबत प्रशासन सजग नसल्यामुळे पाणी टंचाई भासत आहे. याचा परिणाम ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.सदर समस्येबाबत गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सांगितले आहे. परंतु या समस्येचे निवारण अद्यापही करण्यात न आल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. अर्जुनी गावातील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र गजभिये यांनी सांगितले की, सन २०१३-१४ मध्ये सदर जलकुंभ तयार करण्यात आला. त्याची क्षमता ६५ हजार लिटरची आहे. या जलकुंभामधून नळ जोडण्या लावण्यात आल्या. मात्र अनेक महिन्यांपासून नागरिकांच्या घरी नळापर्यंत पाणी पोहोचतच नाही. तसेच अनेक ठिकाणातून पाईप लाईन फुटून पाणी बेवारस पाणी जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकाराबाबत गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. जर ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देणार नाही, तर कोण देईल? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. सदर समस्या त्वरित सोडवून नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचविण्यात यावे, अशी मागणी अर्जुनीवासीयांनी केली आहे.