शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी सरली, जनजीवन पूर्वपदावर

By admin | Updated: October 27, 2014 22:38 IST

दिवाळीच्या सुट्या सरल्या असून कामाकाजाला पुन्हा सुरूवात झाली आहे. शहरातील काही शाळांचा ठोकाही वाजला असून विद्यार्थी शाळेत जाताना दिसून येत आहे. तर ओस पडलेल्या कार्यालयांत पुन्हा

गोंदिया : दिवाळीच्या सुट्या सरल्या असून कामाकाजाला पुन्हा सुरूवात झाली आहे. शहरातील काही शाळांचा ठोकाही वाजला असून विद्यार्थी शाळेत जाताना दिसून येत आहे. तर ओस पडलेल्या कार्यालयांत पुन्हा गर्दी वाढली आहे. एकंदर दिवळी सरली असून सुट्या संपल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे. दिवाळीचा सण असल्याने बाहेरून येणारे अधिकारी व कर्मचारी सुट्या घेऊन दिवाळी पूर्वीच आपापल्या घरी निघून गेले होते. तर लक्ष्मीपूजनापासून सलग सुट्या असल्याने कार्यालयेही बंदच होती. शिवाय शाळा व महाविद्यालयांच्या सुट्या असल्याने विद्यार्थ्यांची नेहमीची वर्दळ दिसेनाशी झाली होती. सुट्यांमुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. आता मात्र दिवाळीच्या सुट्या संपल्याअसून सोमवारपासून (दि.२७) कार्यालये ही पुन्हा उघडले आहेत. अधिकारी व कर्मचारी दिवाळीच्या सुट्या आटोपून आपापल्या कामावर पुन्हा रूजू झाले आहेत. आता आपली कामे ही होणार हे जाणून नागरिकांनी कार्यालयांकडे धाव घेतल्याने कार्यालयांत गर्दी दिसून आली. त्यातल्या त्यात शहरातील काही शाळांचाही ठोका वाजल्याने विद्यार्थीही गणवेश परिधान करून शाळेत जाताना नजरेत पडले. येथील कित्येक कार्यालयांत कार्यरत अधिकार/कर्मचारी बाहेरगावाहून रेल्वेने अपडाऊन करतात. रविवारपर्यंत (दि.२६) आलेल्या सलग सुट्यांनी या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आवागमन बंद होते. त्यामुळेही शहरात गर्दी दिसून येत नव्हती. मात्र सोमवारपासून (दि.२७) त्यांचेही आवागमन सुरू झाल्याने विदर्भ, छत्तीसगड, अहमदाबाद सारख्या गाड्यांच्या वेळेवर पुन्हा गर्दी दिसून येत आहे. यातून दररोजच्या सामान्य जीवनाची गाडी पुन्हा पटरीवर आल्याचे बघावयास मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)