शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आमसभेला आचारसंहितेचा खोडा

By admin | Updated: May 9, 2016 01:50 IST

दर दोन महिन्यांतून एकदा आमसभा घेणे नगर परिषदेला बंधनकारक आहे. मात्र मागील चार महिन्यांपासून पालिकेची आमसभा झालेलीच नाही.

जानेवारीनंतर आमसभा नाही : आता जूनपर्यंत ‘मुहूर्त’ नाहीगोंदिया : दर दोन महिन्यांतून एकदा आमसभा घेणे नगर परिषदेला बंधनकारक आहे. मात्र मागील चार महिन्यांपासून पालिकेची आमसभा झालेलीच नाही. त्यात आता आचारसंहितेचा खोडा आला आहे. कारण मार्च महिन्यापासून पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून येत्या २ जूनपर्यंत ती कायम राहणार आहे. त्यामुळे आमसभेला २ जूनपर्यंत तरी मुहूर्त मिळणार नाही. नगर परिषदेतील कोणत्याही विकास कामांसह अंतर्गत कामकाजासाठी आमसभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे. याकरिता दर दोन महिन्यांतून एकदा आमसभा घेणे नगर परिषद अनिधियम १९६५ कलम ८२ अंतर्गत बंधनकारक करण्यात आले आहे. सभेत विविध मुद्दे मांडून सभेची मंजुरी मिळाल्यावरच ती कामे केली जातात. अध्यक्षांच्या मागणीवरून ही आमसभा बोलाविली जात असून सभेची विषयसूची अध्यक्ष तयार करतात. यामुळे वेळेवर आमसभा घेणे ही एक प्रकारे अध्यक्षांचीच जबाबदारी आहे. नगर परिषदेत मात्र जानेवारी महिन्यानंतर आमसभा झाली नाही. जानेवारीनंतर दोन महिन्यांनी म्हणजे मार्च महिन्यात आमसभा घेणे गरजेचे होते. मात्र प्रभाग क्रमांक १ साठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. त्यामुळे मार्च महिन्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेत आमसभा घेता आली नाही. मात्र मतदार यादीतील घोळामुळे पोटनिवडणूक रद्द झाली. त्यावेळी आचारसंहिता निघाली असली तरी काही दिवसातच दुसऱ्यांदा राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार येत्या २९ मे रोजी मतदान होणार असून ३० तारखेला मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी दुसऱ्यांदा आचारसंहिता लागली असून ती २ जूनपर्यंत राहणार आहे. परिणामी सहा महिने नगर परिषदेचा कारभार आमसभेशिवायच चालणार आहे. (शहर प्रतिनिधी)