शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शिकले, पण संघटित झाले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 01:43 IST

यंदा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली.

विजय मानकर यंदा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. १४ एप्रिल हा जयंतीचा दिवस असला तरी पाच दिवस आधीपासून आणि नंतरच्या पाच दिवसापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले. तालुक्यात आमगाव खुर्द (सालेकसा) येथे तालुकास्तरीय चार दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन सुरू होते. शेवटच्या दिवशी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले येऊन गेले व समाजाला प्रेरणादायी व हृदयस्पर्शी अशा संबोधन करुन गेले. एकाअर्थी सालेकसा येथील यंदाचे आयोजन हे ऐतिहासिक ठरले म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.जयंती उत्सवाच्या या १० दिवसांदरम्यान तालुक्यात अनेक ठिकाणी कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. या निमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे बाबासाहेबांनी दिलेला ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा,’ हा संदेश तालुक्यात एक-दोन ठिकाणचा अपवाद वगळता अनेक ठिकाणी पोहोचलाच नसल्याचे दिसून आले. बाबासाहेबांनी दिलेला मंत्र कोण्या एका समाजासाठी मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी, नव्हे तर जगासाठी सार्थक ठरणारा मंत्र आहे. परंतु आज त्या मंत्राचा विसर पडलेले लोक डॉ.आंबेडकरांना आदरांजली वाहताना दिसून आले. इतर समाजातील लोकसुद्धा मोठ्या उत्साहात प्रत्येक आयोजनात सहभागी होताना दिसले ही एक चांगली बाब म्हणावी लागेल. एवढेच नाही तर शासकीय स्तरावर सुद्धा मनापासून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. परंतु शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांच्या शिकवणीपैकी शिका या संदेशाचा अंमल बहुतांश ठिकाणी झाला. संघर्ष करण्याचा प्रयोग तर अनेक वर्षापासून होत आहे. परंतु मधला शब्द म्हणजे ‘संघटीत व्हा’ याकडे आजही दुर्लक्ष होत आहे. यामध्ये स्वत:ला उपासक-उपासिका म्हणवून घेणारेच काही लोक जेव्हा संघटीत झालेले दिसून येत नाही. शिकले पण संघटीत झाले नाही, म्हणून संघर्ष करताना अनेकदा अपयश हाती येताना दिसते.सालेकसा तालुक्यात अनेक गावात बौद्ध समाज गटागटात, वर्गा-वर्गात व जाती-उपजातीचा आधार घेऊन विभागलेला आहे. याचा गैरफायदा स्वार्थाचे राजकारण करणारे लोक नेहमी घेत असतात. ही बाब समाजबांधवांनी समजून घेणे आवश्यक आहे. राजकारण करा, पण समाजाला विघटीत आत्मघाती व नुकसान देणारे राजकारण न करता बाबासाहेबांसाठी तरी स्वत: नमते घेत संघटित होऊन काम करणे आणि संघर्ष करणे गरजेचे आहे. तर बाबासाहेबांची खरे अनुयायी आहात हे सिद्ध होईल. प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर या एका भारतीय महापुरुषाची जयंती संयुक्त राष्ट्राने साजरी केली. केवळ भारतच नाही तर यावर्षी १५६ देशात बाबासाहेबांची जयंती साजरी झाली. याचा केवळ आंबडकरी जनतेलाच नाही तर तमाम भारतीयांना अभिमान असायला हवा. या तालुक्यात बाबासाहेबांच्या या शतकोत्तर जयंती उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या शिकवणीवर चालण्याचा संकल्प सर्वांनी मिळून करूया.