शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दोघांच्या भांडणात वॉर्डाचा विकास खुंटला

By admin | Updated: April 5, 2015 01:25 IST

नगरपरिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष हर्षपाल रंगारी यांचा हा प्रभाग आहे. या प्रभागात शिवसेनेचे तीन सदस्य तर कॉंग्रेसचा एकच सदस्य असून शिवसेनेचे प्राबल्य आहे.

कपिल केकत गोंदियानगरपरिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष हर्षपाल रंगारी यांचा हा प्रभाग आहे. या प्रभागात शिवसेनेचे तीन सदस्य तर कॉंग्रेसचा एकच सदस्य असून शिवसेनेचे प्राबल्य आहे. त्यातही रंगारी हे उपाध्यक्ष असून स्वच्छता विभाग त्यांच्या अखत्यारीत येतो. अशात शहरातील अन्य प्रभागांच्या तुलनेत प्रभाग ९ चे चित्र आगळेवेगळे असणे गरजेचे आहे. मात्र हा प्रभागही अन्य प्रभागांच्या तुलनेत जास्त समस्यग्रस्त दिसला. पंचायत समिती कॉलनी परिसर रंगारी बघतात. तर लता रहांगडाले यांच्याकडे पैकनटोली परिसर आहे. मात्र येथील राजकीय व्देषामुळे वॉर्डाचा विकास खुंटल्याचे दिसून येत आहे. पंचायत समिती कॉलनी सारख्या परिसरात एकीकडे सफाईची समस्या दिसली. तर पैकनटोली सारख्या परिसरात चांगले बांधकाम व स्वच्छता दिसून आली. सफाई व बांधकामाची प्रभागात गरज असल्याचे दिसले. शहरातील मुख्य परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक ९ मधून विद्यमान उपाध्यक्ष रंगारी निवडून गेले आहे. आजघडीला या प्रभागाला शिवसेनेचा गड म्हणता येणार. शिवसेनेचे तीन सदस्य असलेल्या या प्रभागात उपाध्यक्ष असल्याने या वॉर्डाचा चेहरा-मोहरा अन्य वॉर्डांच्या तुलनेत वेगळा असावा अशी सहाजीकच अपेक्षा आहे. मात्र अन्य वॉर्डांच्या तुलनेत या प्रभागात जास्त समस्या दिसल्या. रंगारी प्रभागातील पंचायत समिती कॉलनी परिसर बघतात. शास्त्री वॉर्ड परिसरातील ते रहिवासी असल्याने त्यांच्या लगतचा हा परिसर आहे. या परिसरात गजानन महाराज मंदिरा समोरील मार्गाने प्रवेश केला असता सुरूवातच रस्त्याचे दचके खात होते. पक्क्या नाल्या नसल्याने उघड्यावरच सांडपाणी वाहत असून दुर्गंध पसरवीत आहे. आतील मुख्य मार्गाची तर पार दुरवस्था झाली आहे. मोठाले खड्डे बघताच रस्ता बदलून टाकावा अशी गत झाली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात नाल्यांचे बांधकाम दिसून येते. रस्त्यांचेही बांधकाम हवे आहे. मात्र नाल्यांची सफाई होत नसल्याने सांडपाण्याने तुंबलेल्या नाल्या परिसरात ठिकठिकाणी दिसून येतात. एका ठिकाणी तर नाल्यांतले सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे चित्र बघावयास मिळाले. नागरिकांना विचारले असता काहींनी नगरसेवक येतात असे सांगीतले, तर काहींनी नगरसेवकांचे दर्शन दुर्लभ असल्याचे बोलून दाखविले. तर प्रभागातील दुसऱ्या सदस्य लता रहांगडाले या गणेशनगर निवासी असून पैकनटोली परिसर त्या बघतात. अशात गणेशनगरात काही कामे करावयाची असल्यास राजकीय द्वेषातून विरोधी नगरसेवक अडसर निर्माण करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पैकनटोली परिसरात फेरफटका मारला असता तेथे बांधकामाचे जाळे दिसून आले. शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात हवे तसे सिमेंटचे चकाचक रस्ते येथे दिसतात. परिसरात चांगल्या प्रमाणात सफाईही दिसली. मात्र काही ठिकाणी नाल्यांची समस्या कायम असून बांधकामासह सफाईची मागणी केली जात आहे. तुंबलेल्या नाल्यांचे येथे दर्शन झाले. मात्र बांधकामात ही बाब दबून जाते. नगरसेवकांचे नियमीत फिरणे व सफाई कामे केली जात असल्याचे नागरिकांनी सांगीतले. उखडलेला मोक्षधाम मार्ग ही दुरूस्त झाल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले. पिंकडेपार परिसरात रस्त्यांची समस्या दिसून आली असून सदस्यांनी आपापले वॉर्ड वाटून घेतले असले तरिही प्रभाग एकच असल्याने त्यांनी आपली जबाबदारी समजून कर्तव्य पार पाडावे अशा प्रतिक्रीयाही प्रभागातील काही नागरिकांनी व्यक्त केल्या. एकंदर उपाध्यक्ष रंगारींकडून प्रभागवासीयांनी मोठ्या प्रमाणात अपेक्षा बाळगल्या आहेत. आता सत्तेत असताना तरी त्यांनी पूर्तता करावी एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे.