शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.समोर कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाविरोधात तसेच राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे गोठविलेले भत्ते व अन्य मागण्यांकडे ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन : कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाविरोधात तसेच राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे गोठविलेले भत्ते व अन्य मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (दि.३) दुपारच्या सुटीत जि.प. तसेच इतर शासकीय कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राष्ट्रीय निषेध दिन सुद्धा शांततेच्या मार्गाने पार पाडण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाच्या नेतृत्त्वात देण्यात आले. निवेदनातून, पीएफआरडीए अंतर्गत अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, कंत्राटी तथा मानधनावरील कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्यात यावे, शासकीय-निमशासकीय महामंडळे नगरपालिका, महानगरपालिका, शैक्षणिक संस्था आणि विविध प्रकल्पातील रिक्त असलेली पदे त्वरीत भरण्यात यावी, कोरोना योद्धांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशा वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचा पुरवठा करण्यात यावा. कर्मचाऱ्यांचे माहे मार्च २०२० चे कपात केलेले २५ टक्के वेतन त्वरीत देण्यात यावे. महागाई भत्ता गोठविण्याचे धोरण रद्द करून जुलै २०२० पासून अद्ययावत महागाई भत्ता फरकासह देण्याचा शासन निर्णय घेण्यात यावा. सातव्या वेतन आयोगाचा दुसरा टप्पा १ वर्षासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा. अंशदायी पेन्शन योजना मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना १० लाख रूपये सानुग्रह अनुदान देण्याबाबत ग्रामविकास विभागाने शासन निर्णय घ्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. शिष्टमंडळात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे (विदर्भ) सहसचिव आशिष रामटेके, जिल्हा अध्यक्ष मदन चुऱ्हे, जिल्हा सरचिटणीस लीलाधर पाथोडे, जि.प. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पी.जी.शहारे, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश मेनन, कार्याध्यक्ष राकेश डोंगरे, उपाध्यक्ष मुकुंद तिवारी, ग्रामसेवक संघटनेचे विभागीय अध्यक्ष कमलेश बिसेन, जिल्हा सचिव ठाकरे उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीzpजिल्हा परिषद