शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोविशिल्ड लसीलाच डिमांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 05:00 IST

कोरोनाशी लढा देण्यासाठी भारतातच तयार करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या लसींचे शस्त्र हाती आले आहे. मात्र, लसीकरणाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. आता पुढे कोरोना आपले पाय पसरू नये, यासाठी जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण करणे हाच एकमेव उपाय असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देनागरिकांचा कल कोविशिल्डकडेच : १.४३ लाख नागरिकांनी घेतली लस

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  : कोरोनाला थोपविण्यासाठी शासनाचा आता जास्तीतजास्त नागरिकांच्या लसीकरणावर जोर दिसत आहे. यासाठी जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात केंद्र वाढवून लसीकरण केले जात आहे. सध्या देशात कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोनच लसी दिल्या जात आहेत. यातही कोविशिल्ड लसीलाच नागरिकांची डिमांड दिसत असून, आतापर्यंत १,४३,१५१ नागरिकांनी कोविशिल्ड लसीचेच डोस घेतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २,१६,०२५ नागरिकांनी लस घेतली आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी भारतातच तयार करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या लसींचे शस्त्र हाती आले आहे. मात्र, लसीकरणाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. आता पुढे कोरोना आपले पाय पसरू नये, यासाठी जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण करणे हाच एकमेव उपाय असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्या दृष्टीने शासन लसीकरणावर जोर देत असून, जास्तीतजास्त नागरिकांच्या लसीकरण करणे हेच मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानुसार, आता जिल्ह्यातही लसीकरणासाठी व्यापक मोहीम छेडण्यात आली असून, लसीकरण केंद्रांची वाढ व जनजागृती केली जात आहे. त्यानुसार, आता लसीकरणाला घेऊन नागरिकांच्या मनातील भीती व शंकाही कमी झाल्या असून, ते लसीकरणासाठी पुढे येत असल्याचे दिसत आहे. मात्र, खास बाब अशी की, जिल्ह्यात कोविशिल्ड लसीलाच नागरिकांची जास्त पसंती दिसत आहे. जिल्ह्यातील लसीकरणाची बुधवारपर्यंतची आकडेवारी बघितल्यास २,१६,०२५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये १,४३,१५१ नागरिकांनी कोविशिल्ड हीच लस घेतली असल्याचे दिसत आहे, तर ७२,८७४ नागरिकांनी कोव्हॅक्सिनची लस घेतली आहे.  

१.६८ लाख नागरिकांनी घेतला पहिला डोस - जिल्ह्यात कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरणावर जोर दिला जात असतानाच, आता नागरिकांनाही लसीचे फायदे दिसून येत असल्याने तेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करीत आहेत. असे असतानाच जिल्ह्यात आतापर्यंत १,६८,०२८ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ४७,९९७ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. लस अत्यंत सुरक्षित असल्याने नागरिकांनी लस घ्यावी, यासाठी शासन प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. 

१८ - ४४ वर्गालाही लस द्या - मध्यंतरी १८ वर्षांपासून पुढे वर्गासाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांतच या वर्गाचे लसीकरण थांबविण्यात आले. विशेष म्हणजे, १८ ते ४४ या वर्गांतील तरुण व युवा कामानिमित्त घराबाहेर पडत असल्याने, त्यांनाही सुरक्षा कवचाची अधिक गरज आहे. करिता आता १८ ते ४४ वर्गांचे लसीकरण सुरू करावे, अशी मागणीही जोर धरत आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस