शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शर्माच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय

By admin | Updated: April 26, 2016 01:39 IST

आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावरील हल्लाप्रकरणी भाजप नगरसेवक शिव शर्मा याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता

गोंदिया : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावरील हल्लाप्रकरणी भाजप नगरसेवक शिव शर्मा याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता मंगळवारी (दि.२६) सुनावणी होणार आहे. त्यांना मदत केल्यामुळे अटकेत असलेल्या दोघांना बुधवारपर्यंत (दि.२७) न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.शर्मा याने वकिलामार्फत १९ एप्रिल रोजी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यांच्या या अर्जावर सोमवारी सुनावणी होती. मात्र अर्जावर न्यायालयाने मंगळवारी (दि.२६) सुनावणी करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे शिव शर्माला या प्रकरणात मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी अनिमेष ऊर्फ राज लक्ष्मीनारायण दुबे (रा. गजानन कॉलनी) व गजेंद्र रामचरण साते (रा. मरारटोली) या दोघांना अटक केली होती. दोघांचा पीसीआर संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविले होते. त्यांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. यात त्यांना न्यायाधीश ए.बी. तहसीलदार यांनी पुन्हा ९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या शिवाय नगरसेवक पंकज यादव यांच्यावर हल्ला करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. यातील दोन अल्पवयीन असून त्यांना सोडून राजा महेश सांडेकर (२१), निशांत उमेश छडीमलक, सौरभ बिरीया (रा.सावराटोली) व हरी नंदलाल चौधरी (३८, रा.मरारटोली) या चौघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवारी (दि.२५) त्यांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत (दि.२७) पोलीस कोठडीत पाठविले आहे. (शहर प्रतिनिधी)यादवप्रकरणी न्यायालयात एकाला पकडले ४विशेष म्हणजे सोमवारी यादव हल्ल्यातील आरोपींची सुनावणी होत असताना सावराटोली निवासी एक आरोपी न्यायालयात उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्या आरोपीला लगेच ताब्यात घेतले. हा आरोपी न्यायालयात बिनधास्त फिरत असल्यावरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याला यापूर्वी सावराटोली परिसरात एका गाडीत तलवारी लपवून ठेवल्याच्या आरोपात अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे.