दोन कोरोना बाधितांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 05:00 AM2020-10-23T05:00:00+5:302020-10-23T05:00:21+5:30

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेतंर्गत आरोग्य तपासणीवर भर दिला जात असून रुग्ण वाढीचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे ही बाब दिलासादायक आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत होती. त्यामुळे रुग्णांची संख्या बरीच आटोक्यात आली. पण मागील आठ दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. 

Death of two corona sufferers | दोन कोरोना बाधितांचा मृत्यू 

दोन कोरोना बाधितांचा मृत्यू 

Next
ठळक मुद्दे८१ बाधितांची भर : ११८ बाधितांची कोरोनावर मात 

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा आलेख मागील आठवडाभरापासून उंचावत असताना मृतकांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. गुरूवारी (दि.२२) गोंदिया येथील दोन कोरोना बाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११५ कोरोना बाधितांचे बळी गेले आहे. मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने थोडा दिलासा देखील मिळाला आहे. 
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेतंर्गत आरोग्य तपासणीवर भर दिला जात असून रुग्ण वाढीचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे ही बाब दिलासादायक आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत होती. त्यामुळे रुग्णांची संख्या बरीच आटोक्यात आली. पण मागील आठ दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. 
गुरूवारी जिल्ह्यात ८१ कोरोना बाधितांची भर पडली तर ११८ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. तर दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरूवारी आढळलेल्या ८१ काेरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ४६ रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहे. गोरेगाव १,आमगाव २, तिरोडा १, सालेकसा ४, देवरी १, सडक अर्जुनी ५, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील २१ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत गोंदिया येथील प्रयोगशाळेत ३६३८५ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी २७५९१ नमुने कोरोना निगेटिव्ह आले. तर ९०४९ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. आतापर्यंत ७८८४ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली असून सद्यस्थितीत १०५० कोरोना ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. १०९ नमुन्यांचा अहवाल गोंदिया प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे. 
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.१४ टक्के 
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९०४९ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ७८८४ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.१४ टक्के आहे. तर बाधित रुग्णांचा मृत्यू दर १.२२ टक्के असून डब्लिंग रेड ५७.४ टक्के आहे. 
 

Web Title: Death of two corona sufferers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.