शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

पैशासाठी मृतदेह १५ तास अडविला

By admin | Updated: March 26, 2015 01:06 IST

येथील गोंदिया हॉस्पीटलमध्ये निमोनियाचा उपचार घेण्यासाठी २ मार्च पासून दाखल झालेल्या चिमुकलीचा उपचार घेताना २२ दिवसानंतर मृत्यू झाला.

गोंदिया : येथील गोंदिया हॉस्पीटलमध्ये निमोनियाचा उपचार घेण्यासाठी २ मार्च पासून दाखल झालेल्या चिमुकलीचा उपचार घेताना २२ दिवसानंतर मृत्यू झाला. परंतु तिच्या उपचाराचे दोन लाख १३ हजार रूपये भरा अन्यथा मृतदेह देणार नाही असे डॉक्टरांचे म्हणने असल्यामुळे त्यांनी १५ तास चिमुकलीचा मृतदेह देण्यात आला नाही असा आरोप मृत मुलीचे आई-वडील वैशाली देशमुख, संजय देशमुख यांनी केला आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या कुंभीटोला बाराभाटी येथील वैशाली संजय देशमुख या महिलेची प्रसूती गुप्ता नर्सिंग होम मध्ये २ मार्च रोजी झाली. त्यानंतर तिच्या बाळाला निमोनियाझाल्यामुळे त्या बाळाला गोंदिया हॉस्पीटल येथे डॉ. उमेश शर्मा यांच्याकडे २ मार्च दाखल करण्यात आले. तेथील उपचार करतांना त्या बाळाच्या प्रकृतीत ५० टक्के सुधारणा झाली. मंगळवारी अचानक घटनेच्या दोन तासापूर्वी त्यांनी मुलीला नागपूला न्या असा सल्ला दिला. त्यांनतर लगेचच तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्या मुलीचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्या मृत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. यावेळी मानवाधिकार संघटनेचे जयेश उंदीरवाडे, निला ढोरे, निलकुमार अंबुले व अनेकांनी आक्रोश व्यक्त केल्यामुळे त्या मृतदेहाला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)अत्यंत खराब परिस्थीतीत त्या मुलीला दाखल करण्यात आले होते. तिचा उपचार केल्यानंतर काही दिवस प्रकृतीत सुधारणा झाली. परंतु नंतर पुन्हा प्रकृती बिघडत असल्यामुळे तिला नागपूरला नेण्याचा सल्ला दिला होता. त्यांची गरिब परिस्थीती पाहून त्यांच्या उपचाराचे पैसे सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना मृतदेह घेऊन जाण्यासाठी आम्ही फोन केला. त्यांनी एकदाही मृतदेह मागितला नाही. डॉ. उमेश शर्मा गोंदिया हॉस्पीटल गोंदिया.