शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:00 IST

गोंदिया शहरात अवैध धंद्याना ऊत आले त्यामुळे नागरिकांनी निवेदन दिल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घालून ही कारवाई केली. शहरातील विद्यार्थी व युवक हे जुगार खेळविणाऱ्या लोकांकडून पैशाने विशिष्ट प्रकारची आयडी विकत घेऊन त्या आयडीवर पैशांच्या प्रमाणात पॉर्इंटस जमा करुन घेऊन ऑनलाईन जुगाराकडे आकर्षित होतात.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : २.४४ लाखांचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत मरारटोली येथील बग्गा कॉम्प्लेक्स मध्ये सुरू असलेल्या कॅसिनो सेंटर मध्ये शहर पोलिसांनी धाड घालून पाच संगणक संच, नऊ व्हिडीओ गेम मशीन, संगणक साहित्य व रोख नऊ हजार ५६० रुपये असा एकूण दोन लाख ४४ हजार ५६० रुपयांचा माल जप्त केला. या संदर्भात रामनगर पोलिसात सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोंदिया शहरात अवैध धंद्याना ऊत आले त्यामुळे नागरिकांनी निवेदन दिल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घालून ही कारवाई केली. शहरातील विद्यार्थी व युवक हे जुगार खेळविणाऱ्या लोकांकडून पैशाने विशिष्ट प्रकारची आयडी विकत घेऊन त्या आयडीवर पैशांच्या प्रमाणात पॉर्इंटस जमा करुन घेऊन ऑनलाईन जुगाराकडे आकर्षित होतात.यामुळे शहरात सुरू असलेल्या या ऑनलाईन जुगारावर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक जितेंद्र मेश्राम, हवालदार लिलेंद्र बैस, चितरंजन कोडापे, विनय शेंडे व चालक पंकज खरवडे यांनी रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत मरारटोली येथील बग्गा कॉम्प्लेक्स मध्ये सुरू असलेल्या कॅसिनो सेंटरवर धाड घातली. याप्रसंगी तेथे ऑनलाईन जुगार खेळत असलेल्या राकेश मदनलाल नागफासे (३२), योगेश भुवनलाल बोपचे ( ४३,रा.मरारटोली), मनोज भिवराम उईके (३६, रा. आंबेडकर चौक, कुडवा), अनिलकुमार विजयकुमार जैन (५४,रा. रामनगर), नरेंद्र राठोड (रा. मरारटोली), संजय चौरसीया व अनुभव चौरसिया (रा.सिव्हील लाईन्स) यांना रंगेहात पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.पालकांनो आपल्या मुलांचे मोबाईल तपासाआपला मुलगा आपल्या मोबाईलवरुन जुगार तर खेळत नसेल याची चाचपणी पालकांनी करणे आवश्यक आहे. ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या लोकांवर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कारवाई होऊ शकते. मुलांनी आपल्या मोबाईलमध्ये ऑनलाईन जुगाराचे अप्लीकेशन डाऊनलोड तर केले नाही ना याची खात्री करावी असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.