शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
4
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
5
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
6
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
7
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
8
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
9
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
10
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
11
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
12
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
13
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
14
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
15
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
16
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
17
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
18
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
19
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
20
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
Daily Top 2Weekly Top 5

बँक आॅफ इंडियावर वक्रदृष्टी

By admin | Updated: February 4, 2015 23:16 IST

बुधवारचा (दि.४) दिवस बँक आॅफ इंडियासाठी अपशकुनी ठरला. त्याचे कारण असे की, बॅकेच्या येथील अग्रसेन भवन जवळील शाखेच्या खातेधारक महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी

गोंदियात महिलेच्या खात्यातून २४ हजार काढले गोंदिया : बुधवारचा (दि.४) दिवस बँक आॅफ इंडियासाठी अपशकुनी ठरला. त्याचे कारण असे की, बॅकेच्या येथील अग्रसेन भवन जवळील शाखेच्या खातेधारक महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी २३ हजार ९२० रूपये काढून घेतले. तर तिरोडा तालुक्यातील ग्राम परसवाडा येथील बँकेचे एटीएम मशीन कापून त्यातून एक लाख ८८ हजार रूपये काढून नेण्यात आले आहे. जवळील ग्राम खमारी येथील रहिवासी मुनेश्वरी चंद्रकुमार पटले (२६) या गावातीलच अध्यापक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी (दि.४) सकाळी १० वाजता दरम्यान त्यांना ९७०९०३७०७९ या क्रमांकावरून मोबाईलवर कॉल आला. एका पुरूषाने त्यांना तुमच्या एटीएमने मागील चार महिन्यांपासून व्यवहार झाले नसल्याने एटीएमचा पीनकोड बदलण्यात आला असल्याचे सांगत पीन कोड मागीतला. यावर मुनेश्वरी पटले यांनी एटीएमचा पीन कोड सांगीतला. त्यानंतर त्या महाविद्यालयात गेल्या व प्रा. रवीप्रकाश चंद्रीकापुरे यांना घडलेला प्रकार सांगीतला. कॉलकरून लुबाडण्याच्या हा प्रकार असल्याचे त्यांनी दुपारी १२ वाजता दरम्यान येथील बँकेत येऊन खात्यातील रकमेची पाहणी केली. मात्र तोपर्यंत मुनेश्वरी पटले यांच्या खात्यातून २३ हजार ९२० रूपये काढण्यात आल्याचे दिसले. तर त्यांच्या खात्यात फक्त २२ रूपये शिल्लक सोडून दिले होते. प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. मोबाईलवर कॉल करून एटीएमचा क्रमांक जाणून घेण्यासाठी आल्यादिवशी कॉल्स येत असल्याचे कानी पडते. अशा प्रकारांवर पोलिसांकडून कारवाई करणे गरजेचे असून नागरिकांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)बँक प्रबंधकांना फासण्याचा प्रयत्न मुनेश्वरी पटले यांच्यासह कित्येकांसोबत फसगतीचा असला प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे यापासून बॅक आॅफ इंडियाच्या अग्रसेन भवन जवळील शाखेचे प्रबंधक ललीत रहांगडाले यांनाही अशाचप्रकारचा कॉल काही दिवसांपूर्वी आला होता. त्यांना एका महिलेने कॉल करून अशाचप्रकारची बतावणी करून एटीएमचा पीनकोड जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रहांगडाले यांनी त्या महिलेला खडसावले असता तिने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन त्यांच्याशी शिवीगाळ करीत फोन बंद केला होता.