शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनमुळे शेतातच वाळली काकडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

तालुक्यातील रेंगेपार, खडकी, बाम्हणी, चिखली येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काकडीची लागवड केली आहे. सुदैवाने यंदा काकडीचे पीक सुध्दा चांगले आहे. दरवर्षी मार्चपासून काकडीला लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी मोठी मागणी असते. मात्र यंदा कोरोनामुळे राज्यात २५ मार्चपासून लॉकडाऊन आहे.परिणामी उद्योग धंदे, बाजारपेठा सर्वच बंद असून लग्न समारंभ देखील रद्द झाले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटका : लागवडखर्च भरुन निघणे झाले कठीण, आर्थिक मदतीची अपेक्षा

राजेश मुनिश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प आहे. आठवडी बाजार देखील बंद असून लग्न समारंभ व सर्वत्र कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. यामुळे भाजीपाल्यासह इतर शेतमालाची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. याचाच फटका तालुक्यातील काकडी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. लॉकडाऊनमुळे काकडीची मागणी घटल्याने शेतातच काकडी वाळल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.तालुक्यातील रेंगेपार, खडकी, बाम्हणी, चिखली येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काकडीची लागवड केली आहे. सुदैवाने यंदा काकडीचे पीक सुध्दा चांगले आहे. दरवर्षी मार्चपासून काकडीला लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी मोठी मागणी असते. मात्र यंदा कोरोनामुळे राज्यात २५ मार्चपासून लॉकडाऊन आहे.परिणामी उद्योग धंदे, बाजारपेठा सर्वच बंद असून लग्न समारंभ देखील रद्द झाले आहे. त्यामुळे काकडीला बाजारपेठेत मागणीच नसल्याचे चित्र आहे. याचा फटका मात्र काकडी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. रेंगेपार येथील शेतकरी लहू डोंगरवार यांच्या पाच एकर शेतीत काकडीची लागवड करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगले उत्पन्न घेऊ, या आशेवर असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे शेतातील काकडी शेतात राहिली.मागणी नसल्याने शेतकऱ्यांनी न तोडल्याने ती शेतातच वाळली.त्यामुळे त्यांनी काकडी लागवडीसाठी केलेला खर्च देखील वाया गेला. त्यामुळे त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. आता काहीच उत्पन्न हाती येणार नसल्याने बँकेचे कर्ज आणि उधार उसणवारी घेतलेल्या पैशाची परतफेड कुठून करायची असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. तर शेतात बहरुन आलेले काकडीचे पीक पूर्णपणे मातीमोल होत असल्याचे शेतकऱ्यांना पाहयला मिळत असल्याने त्यांच्या डोळ्यात देखील अश्रू तरळत आहेत. काकडीचे उत्पादन घेण्यासाठी वर्षभर घेतलेली मेहनत सुध्दा पूर्णपणे व्यर्थ गेली आहे.शासनाकडून मदतीची अपेक्षाकोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भाजीपाला, काकडीसह इतर शेतमालाला मागणीच नसल्याने शेतकऱ्यांना ते फेकून द्यावे लागत असल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने शेतकºयांची दखल घेवून त्यांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे.गेल्यावर्षी मी पाच एकर शेतीत काकडीची लागवड करुन पाच ते सात लाख रुपयांचे उत्पन्न घेतले होते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे काकडी मागणी नसल्याने शेतातच काकडी सडत आणि वाळत चालली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले.- लहू डोंगरवार, शेतकरी रेंगेपार..................................................रेंगेपार परिसरात बाराशे एकर शेतीत काकडी, टरबूज ,खरभूज, दोडका, कारली, ऊस आदी पिकांची लागवड केली जाते. माझ्याकडे सध्या ३६ एकरात ऊस व एक एकरात काकडी पिकाची लागवड केली आहे. मात्र मागणी नसल्याने हा माल शेतातच पडून आहे.- प्रभू डोंगरवार, प्रगतीशील शेतकरी रेंगेपार.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती