शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळांडूची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या १०४ वर पोहचली आहे. कोरोना संक्रमणाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. रूग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. अशा स्थितीत थोडासाही हलगर्जीपणामुळे मोठे नुकसान होवू शकते. गोंदिया शहराचे सर्वच खेळाचे केंद्र (कराटे, जुडो, बुध्दीबळ) यांना बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देनियम धाब्यावर : बालकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी एकीकडे शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. क्रीडा केंद्रही बंदच आहेत. परंतु दुसरीकडे शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम येथे खेळण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत आहेत. इंदिरा गांधी स्टेडियम येथे मुलांना खेळण्याची परवानगी कुणी दिली? नियमांना बगल देत येथे शेकडोच्या संख्येत बालके एकत्र येत असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या १०४ वर पोहचली आहे. कोरोना संक्रमणाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. रूग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. अशा स्थितीत थोडासाही हलगर्जीपणामुळे मोठे नुकसान होवू शकते. गोंदिया शहराचे सर्वच खेळाचे केंद्र (कराटे, जुडो, बुध्दीबळ) यांना बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.परंतु या आदेशाची अमंलबजावणी करण्यात अधिकारी अपयशी ठरत आहेत. इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सकाळी ५ ते ८ वाजताच्या दरम्यान शेकडोच्या संख्येत पाच ते सहा वर्षातील बालकांपासून २५ वर्षाच्या तरूणांपर्यंत खेळाडू फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, हॉकी खेळतात. स्टेडियममध्ये जुडो कराटेचे क्लासेस सुध्दा चालतात. इंदिरा गांधी स्टेडियममध्ये बिनधास्त खेळण्याची मुभा दिली तर इतर केंद्रांना बंद ठेवण्याचे काहीच औचित्य नाही.आदेशाला जुमानत नाहीतप्रशासनाद्वारे कोरोना व्हायरस संक्रमणाला आळा घालण्यासाठी गर्दी करू नये, सुरक्षित अंतर ठेवा, हात साबणाने स्वच्छ, धुवा, सॅनिटायझरचा वापर करा असे निर्देश दिले असताना या नियमांचे पालन इंदिरागांधी स्टेडियममध्ये होताना दिसत नाही.इंदिरा गांधी स्टेडियममध्ये खेळाची परवानगी देण्यात आली नाही.स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खेळासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती नाही. याची माहिती घेवून निश्चित योग्य कारवाई केली जाईल.- चंदन पाटील, मुख्याधिकारी,नगर परिषद गोंदिया.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या