भजेपार येथे कोरोना योद्धे सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST2021-01-13T05:15:12+5:302021-01-13T05:15:12+5:30

अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. उद्घाटन माजी आमदार भेरसिंह नागपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे ...

Corona warriors honored at Bhajepar | भजेपार येथे कोरोना योद्धे सन्मानित

भजेपार येथे कोरोना योद्धे सन्मानित

अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. उद्घाटन माजी आमदार भेरसिंह नागपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सभापती लता दोनोडे, महिला जिल्हा कांग्रेस कमिटी प्रतिनिधी वंदना काळे, भाजेपारचे सरपंच सखाराम राऊत, गिरोलाचे सरपंच परसराम फुंडे, तुकाराम बोहरे, उपसरपंच कैलाश बहेकार, ग्रामपंचायत सदस्य ललिता पाथोडे, पवन पाथोडे, रमेश चुटे, टीना चुटे उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सरस्वती मातेच्या छायाचित्राचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील ग्राम बोदलबोडी येथील कविता शेंडे, देवराम चुटे, सुरेश बोहरे, बाजीराव तरोणे तसेच ग्राम साकरीटोला येथील युवा प्रोग्रेसिव्ह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कार्यांबद्दल कोरोना योद्धा म्हणून खासदार नेते यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संचालन देवराम चुटे यांनी केले. आभार चंद्रकुमार बहेकार यांनी मानले. कार्यक्रमासाठी चंद्रकुमार पाथोडे, ओम बहेकार, मोतीराम चुटे यांच्यासह ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती, पत्रकार संघटना, वन व्यवस्थापन समिती, महिला बचतगट भजेपारवासीयांनी सहकार्य केले.

Web Title: Corona warriors honored at Bhajepar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.