शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर बदलला घराघरातील आहार, हेल्दी पदार्थ खाणे वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 05:00 IST

कोरोनाचा सर्वाधिक परिणाम रोगप्रतिकारक्षमतेवर झाला. यामुळे ती कशी वाढविता येईल यावरच आता सर्वांचा भर आहे. त्यामुळे दररोजच्या जेवणात कडधान्य, हिरव्या भाज्या आणि सलाद सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. तेलकट पदार्थांना आता गृहिणींनी बाजूला ठेवत कुटुंबीयांची काळजी घेत पौष्टिक घटकांचा वापर वाढविला आहे.

ठळक मुद्देरोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर : सकस आहाराचे सेवन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा संसर्ग आता बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आला असून, कोरोनाची दुसरी लाट आता आटोक्यात आली आहे. मात्र, कोरोनाने मानवी जीवन शैलीतसुद्धा अनेक बदल झाले आहेत, तसेच काहीसे बदल आहार आणि विहारामध्येसुद्धा झाले आहेत. त्यामुळे घरातील स्वयंपाकगृहात तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांची जागा आता पौष्टिक अन्नाने घेतली आहे. गृहिणींनी किचनमध्येसुद्धा बदल केल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा सर्वाधिक परिणाम रोगप्रतिकारक्षमतेवर झाला. यामुळे ती कशी वाढविता येईल यावरच आता सर्वांचा भर आहे. त्यामुळे दररोजच्या जेवणात कडधान्य, हिरव्या भाज्या आणि सलाद सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. तेलकट पदार्थांना आता गृहिणींनी बाजूला ठेवत कुटुंबीयांची काळजी घेत पौष्टिक घटकांचा वापर वाढविला आहे. कोरोनाला प्रतिबंधात्मक ठरणाऱ्या आल्याचा रस, हळदयुक्त दूध, कडुनिंबाच्या पाल्याचा रस, आल्याचा चहा, निंबू पाणी, आयुर्वेदिक काढा आदी पेयांचा वापर केला जात आहे, तर रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गृहिणी दररोज नाश्त्यासाठी कडधान्याची उसळ, दूध, सलाद, अंडी आदींचा वापर वाढविला आहे. जेवणात वरण-भात, पोळी व हिरव्या पालेभाज्यांचा वापर वाढविला आहे. त्यामुळे आरोग्याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.  

कच्च्या भाज्या, कडधान्याचा वाढला वापरकाेरोनाचा संसर्ग होऊ न देणे हाच मोठा खबरदारीचा उपाय आहे. यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गृहिणींनी दररोजच्या आहारामध्ये बदल करीत हिरव्या भाज्या, कडधान्य, सलाद यांचा वापर वाढविण्यावर भर दिला आहे. कोरोनाचा धसका अनेकांनी घेतला. कोरोनाचे शरीरावर अनेक दुष्परिणाम झाले. अशक्तपणा व रोगप्रतिकारक्षमता कमी झाली. त्यामुळे गृहिणींमध्ये याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. त्यांनी कुटुंबीयांची काळजी घेत पौष्टिक आहारावर भर दिला आहे. 

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जेवणात हे हवेचकोरोनाचा सर्वाधिक परिणाम हा रोगप्रतिकारक्षमतेवर झाला आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ नये ती वाढविण्यावर भर दिला जात आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दररोजच्या जेवणात तुळस, मिरी, कलमी, लवंग, लसूण, अद्रक, हळद, सलाद, मोडयुक्त कडधान्य, अंडी, फळे, आयुर्वेदिक काढा, कोमट पाण्याचे सेवन करणे गरजेचे आहे. त्यामुळे या गोष्टींकडे आता अधिक लक्ष दिले जात आहे. 

फास्ट फूडवर अघोषित बंदी कोरानामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दोन ते तीन महिने अनेक हॉटेल्स, रेस्टाॅरंट बंद होते. त्यामुळे अनेकांची फास्ट फूड खाण्याची सवय तुटली आहे. फास्ट फूड हे लहान मुलांसाठी घातक असल्याचे डॉक्टर सांगतात. कोरोनामुळे का होईना पालकांनीसुद्धा आता आपल्या पाल्यांना फास्ट फूडपासून बऱ्याच प्रमाणात दूर ठेवल्याचे चित्र आहे. थंड पदार्थ, आइस्क्रीम, हॉटेलमधील व उघड्यावरील पदार्थ खाणे टाळत असल्याचे दिसून येते. 

गृहिणी म्हणतात...

कोरोनापूर्वी गृहिणी कुटुंबातील सदस्यांच्या आवडीनिवडीनुसार जेवण तयार करीत; पण आता तसे राहिले नाही. कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:ची व कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेत रोगप्रतिकारक्षमता वाढविणाऱ्या पदार्थांवर स्वयंपाकघरात भर देत आहे. त्यानुसारच दररोजचे जेवण तयार केले जात आहे.  - कविता शिवणकर, गृहिणी

लाॅकडाऊनमुळे मागील दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शिकण्यासाठी बाहेरगावी राहत असलेली मुलेसुद्धा आता घरीच आहेत. मुले घरीच असल्याने त्यांच्या आवडीनुसार पदार्थ तयार करीत होते. मात्र, कोरोनामुळे किचनमध्येसुद्धा बरेच बदल करावे लागले. कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची काळजी अधिक भर दिला आहे. - संगिता गुप्ता, गृहिणी

कोरोनाने बऱ्याच नवीन गोष्टी शिकविल्या आहेत. यामुळे स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये बराच बदल झाला आहे. दररोजचा नाश्ता आणि जेवणाचे स्वरूप बदलले आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे पदार्थ बनविण्यावर अधिक भर देत आरोग्याची काळजी घेत आहे. - रश्मी अग्निहोत्री, गृहिणी 

 

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या