शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

२१ दिवसात कोरोना रुग्ण वाढीचा दर तिप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 05:00 IST

जिल्ह्यात २७ मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर दीड महिना जिल्हा कोरोनामुक्त होता. मार्च ते जुलै पाच महिन्यांच्या कालावधीत केवळ २८८ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. ऑगस्ट महिन्यात कोरोना बाधितांचा ग्राफ अधिक वाढला. आॅगस्ट महिन्यात ११६९ कोरोना बाधितांची नोंद झाली तर २६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे३४०७ बाधितांची भर : ५० कोरोना बाधितांचा मृत्यू : वेगाने वाढतोय संसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून मागील २१ दिवसात तब्बल ३४०७ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर ५० कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून कोरोना बाधितांचा वेग सप्टेंबर महिन्यात तिप्पट झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.जिल्ह्यात २७ मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर दीड महिना जिल्हा कोरोनामुक्त होता. मार्च ते जुलै पाच महिन्यांच्या कालावधीत केवळ २८८ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. ऑगस्ट महिन्यात कोरोना बाधितांचा ग्राफ अधिक वाढला.आॅगस्ट महिन्यात ११६९ कोरोना बाधितांची नोंद झाली तर २६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. ऑगस्ट महिन्यात वाढलेला कोरोना रुग्ण वाढीचा वेग सप्टेंबर महिन्यात कमी होईल असा अंदाज आरोग्य यंत्रणेकडून वर्तविला जात होता. मात्र तो अंदाज पूर्णपणे फोल ठरला आहे. १ ते २१ सप्टेंबर या २१ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ३४०७ कोरोना बाधितांची नोंद झाली असून ५० कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्ण वाढीचा दर तिप्पट झाला असून सरासरी दररोज १५० कोरोना बाधितांची नोंद होत आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम असतानाच कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे.मागील २१ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ५० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.सरासरी दररोज तीन कोरोना बाधितांचा मृत्यू होत असल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.वाढते संक्रमण रोखण्यात आरोग्य यंत्रणा अपयशीजिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणेचा अनागोंदी कारभार पुढे येत आहे. शासकीय रुग्णालयात रिक्त असलेली डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याची ओरड आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना त्याला प्रतिबंध लावण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरल्याचे चित्र आहे.तक्रारीत दररोज वाढकोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्वॅब नमुने तपासणी केंद्रावर सुध्दा अनागोंदी कारभार कायम आहे. येथे स्वॅब नमुने वेळेत घेतले जात नसून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रुग्ण एकत्रच रांगेत लागत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्यास मदत होत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या