शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्ह आहात... घाबरु नका, सावरुन घ्या..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

पीपीई किट घातलेले कर्मचारी चौकशी सुरु करतात गल्लीत नागरिक हे सर्व पाहत असतात. परंतु याच तणावात आपल्याला लागणाऱ्या वस्तू आठवणीने रुग्णांच्या घरातील सदस्यांनी देण्याची गरज असते. घरातील इतरांना तातडीने स्त्राव देण्यासाठी नेण्याचा आग्रह सुरु होतो.

ठळक मुद्देरुग्णांसाठी सूचना : रुग्णालयात दाखल होताना आवश्यक साहित्य घ्या, अनावश्यक धावपळ टाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायतीमधून तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात म्हणून तुम्हाला फोन येतो आणि घरातील वातावरण बदलून जाते. काय कराव सुचत नाही. घरातील अन्य सदस्य तर हबकलेलेच असतात, मग गोंधळून न जाता डोके शांत ठेवून रुग्णालयात दाखल होताना काय साहित्य घ्यायचे आहे याचा विचार करावा आणि ते साहित्य सोबत घ्यावे, अन्यथा नंतर हे साहित्य देण्यासाठी इतरांना धावपळ करावी लागते. तुमच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर अर्ध्या तासातच तुमच्या गल्लीत यंत्रणा दाखल होते फवारणी सुरु होते. पीपीई किट घातलेले कर्मचारी चौकशी सुरु करतात गल्लीत नागरिक हे सर्व पाहत असतात. परंतु याच तणावात आपल्याला लागणाऱ्या वस्तू आठवणीने रुग्णांच्या घरातील सदस्यांनी देण्याची गरज असते. घरातील इतरांना तातडीने स्त्राव देण्यासाठी नेण्याचा आग्रह सुरु होतो. त्यामुळे अन्य सदस्यही भांबावून जातात. म्हणूनच रुग्णवाहिका येण्याआधी आवश्यक साहित्य घेण्याची गरज असते.कोरोना स्त्रावाचा अहवाल पॉझिटिव्ह आला की, धावपळ उडते आणि कोरोनाच्या रुग्णांसह नातेवाईक भांबावून जातात. रुग्णालयात दाखल होताना नेमके साहित्य काय घ्यावे आणि तिथे काय काळजी घ्यावी, याची माहिती खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी खास माहिती.पॉझिटिव्ह रुग्णाने हे घ्यावेब्रश, पेस्ट, दंतमंजन, १०-१२ दिवसांसाठी लागणारे कपडे, एखादे बेडशीट, चादर, काही औषधे सुरु असतील तर ती घ्यावीत, आंघोळ व कपडे धुण्याचे साबण, तेल, कंगवा, गरम पाण्यासाठी इलेक्ट्रिक किटली किंवा थर्मास, काही फळे, बिस्कीट, सॅनिटायझर, मास्क आणि ग्लोव्हज.रुग्णाच्या घरातील सदस्यांसाठी आवश्यकसंस्थात्मक अलगीकरणामध्ये किमान ८-१० दिवस राहावे लागणार आहे. याची जाणीव ठेवून वरीलप्रमाणे आपले साहित्य घ्यावे, कारण त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले तरी त्यांना संस्थात्मक अलगीकरणामध्ये राहावे लागते. २-३ दिवसांनी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर स्थानिक प्रभाग समितीच्या पत्रानुसार हॉटेलमध्येही राहता येते. हॉटेलमध्ये क्वारंटाईन होण्यासाठी निगेटिव्ह अहवालाची प्रत व हॉटेल आरक्षित केल्याची पावती आवश्यक ठरते. घरी राहण्यासाठी निगेटिव्ह आल्याची प्रत व समितीच्या सचिवांच्या पत्राची गरज असते.प्रशासनाने ही माहिती द्यावीप्रशासनाकडून आलेल्या कर्मचाऱ्यांनी शांतपणे रुग्ण आणि नातेवाईकांना काय बरोबर घ्यावे, किती दिवस रहावे लागेल याची थोडक्यात माहिती देण्याची गरज आहे. ही माहिती दिल्यास ते रुग्ण आणि नातेवाईकांसाठी सोयीचे होणार आहे.आधार व रेशन कार्डच्या झेरॉक्ससंबंधितांनी आधारकार्ड व रेशनकार्डच्या झेरॉक्स सोबत घेण्याची गरज आहे. डिस्चार्ज देताना महात्मा फुले योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी याची गरज पडू शकते. मोबाईलमध्ये आधार आणि रेशनकार्ड असले तरी प्रिंट कुठे काढायची असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या