शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्र सुरू करण्यास सहकारी सब एजंट संस्था उदासीन

By admin | Updated: October 28, 2014 23:00 IST

शासकीय आधारभूत हमीभाव धान खरेदी करणाऱ्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सब एजन्ट संस्था संघटनेची सभा आदर्श धान गिरणी सानगडी येथे संघटनेचे अध्यक्ष नामदेव कापगते यांच्या

अर्जुनी/मोरगाव : शासकीय आधारभूत हमीभाव धान खरेदी करणाऱ्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सब एजन्ट संस्था संघटनेची सभा आदर्श धान गिरणी सानगडी येथे संघटनेचे अध्यक्ष नामदेव कापगते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर येथील धान खरेदी करणाऱ्या सह. संस्थाचे अध्यक्ष, सचिव व संचालक उपस्थित होते. सभेमध्ये धान खरेदी करणाऱ्या संस्थांपुढे येत असलेल्या अडचणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये सन २००९-१०, २०१०-११ मध्ये खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईसाठी शासनाकडून ३६ ते ४० महिन्यांपर्यंत उचल करण्यात आली. यामध्ये नैसर्गिक घट जास्त प्रमाणात आलेली आहे. उशीरा भरडाईसाठी शासनाने धानाची उचल केली. याला सब एजन्ट संस्था जबाबदार नाहीत. तरी त्यामध्ये आलेली संपूर्ण घट मंजूर करावी. तसेच सब एजन्ट संस्थांकडे खरीप व रब्बी हंगामाचा २०१४ चा धानसाठा पडून आहे. त्याच्या भरडाईसाठी अजूनपर्यंत उचल झालेली नाही. त्यामध्ये येणारी नैसर्गिक घट मंजूर करण्यात यावी. गोदाम मालकांचे सन २००९ ते २०१३-१४ पर्यंतचे गोदाम भाडे मिळाले नाही, ते देण्यात यावे. भाडे न मिळाल्यामुळे गोदाम मालक गोदामात धान ठेवण्यासाठी देण्यास तयार नाही. खरेदी खर्च व हमाली दरामध्ये वाढ करण्यात यावी. कारण शासनाने रोजगार हमी योजनेमध्ये मजुरीचे दर वाढविले आहेत. माथाडी कामगारांच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर धान काटा करण्यासाठी हमाल मिळत नाहीत. त्यामुळे हमाली दर रुपये १७ प्रति क्विंटल देण्यात यावे. धान खरेदी करणाऱ्या सब एजन्ट सहकारी संस्थाचे वर्ष २००९-१०, २०१०-११, २०११-१२, २०१२-१३, २०१३-१४ चे धान खरेदीचे हिशेब झालेले नाहीत. ते पूर्ण करण्यात यावे व संस्थांना कमिशन देण्यात यावे. धान खरेदीवरील कमिशन पाच टक्के देण्यात यावे, अशी संघटनेची मागणी आहे. आधारभूत हमी भाव धान खरेदी केंद्रांमध्ये खरेदी केलेल्या धानाच्या साठवणुकीमध्ये येणारी तुट मंजूर किती राहील, हे खरेदीच्या वेळेस सब एजन्ट संस्थांना कळविण्यात यावे. याचे कारण म्हणजे सन २०१२ ते २०१४ मधील धान साठवणुकीधील घट अजूनपर्यंत मंजूर झालेली नाही. केंद्रावर धानाची खरेदी होताच त्वरीत भरडाईसाठी धानाची उचल करण्यात यावी, अशी मागणी सब एजन्ट संघटनेव्दारे करण्यात आली आहे.सभेला भेरसिंग नागपुरे (आमगाव), रमेश चुऱ्हे, सदाशिव खैरे, विजयसिंह राठोड, घनशाम खेडीकर, नरेश दिवठे, रेखलाल टेंभरे, भूमेश्वर माहावडे, माणिकराव ब्राम्हणकर, टिकाराम बोरकर, खेडीकर, बबन श्रीकुंठवार, भिकाजी चव्हाण, गोपीचंद भेलावे, तलमले व मने आदी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)