शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

कालीसरार धरणात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST

महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर असलेला बाघ जलाशय सिरपूर धरण म्हणून ओळखले जाते. या धरणाची पाणी साठवण क्षमता ५.५० टीएमसी असून यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने धरण अद्याप रिकामेच आहे. त्यामुळे जुनाच जलसाठा असून सध्या फक्त एक टीएमसीच्या जवळपास आहे.

ठळक मुद्देपावसाचा खंड : शेतकऱ्यांची वाढली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : लाखो शेतकऱ्यांच्या लाईफ लाईन मानल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील जलाशयाने उन्हाळ्यात तळ गाठले होते. तीच स्थिती आजही कायम आहे. सिरपूर आणि पुजारीटोला धरणात केवळ राखीव जलसाठा शिल्लक आहे. तर कालीसरार धरणात ठणठणाट आहे. अशात पुढे दमदार पाऊस झाला नाही तर शेतीला एक थेंब ही पाणी मिळणार नाही. परिणामी पावसाअभावी लाखो हेक्टर शेतीतील धानपिक धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर असलेला बाघ जलाशय सिरपूर धरण म्हणून ओळखले जाते. या धरणाची पाणी साठवण क्षमता ५.५० टीएमसी असून यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने धरण अद्याप रिकामेच आहे. त्यामुळे जुनाच जलसाठा असून सध्या फक्त एक टीएमसीच्या जवळपास आहे.सध्या स्थितीत येथे फक्त २४ टक्के पाणी असून चालू परिस्थितीत रोवणी कामासाठी शेतीला पाणी दिले जात आहे. अवघ्या दोन-चार दिवसात येथे जलसाठा २० टक्यावर येणार असून त्यानंतर या जलाशयाचे पाणी सोडणे शक्य आहे. पुजारीटोला धरणाची संग्रहण क्षमता १.५० टीएमसी असून सध्या स्थितीत या धरणात फक्त ०.४ टीएमसी पाणीसाठा उरलेला आहे. अर्थात रिजर्व २० टक्के जलसाठा राहिलेला आहे. तर कालीसरार धरणात ठणठणाट आहे.पर्जन्यमान फारच कमीजिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी १३२७ मी.मी.पाऊस पडतो. अशात आतापर्यंत सालेकसा तालुक्यासह जिल्ह्यात ४०० ते ५०० मीमी पाऊस पडणे अपेक्षित होते. परंतु आतापर्यंत पावसाने येथे १०० मीमीची सरासरी सुद्धा गाठली नाही. त्यामुळे एकीकडे शेतीची कामे रखडली आहेत. तर जलाशय ही तहानलेले आहेत. तर पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस