शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

धान रोपवाटिकेमध्येच करा खोडकिडीचे नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

धान खोड किडीचे सुरवातीच्या टप्प्यात नियंत्रण होऊन रोवणीनंतर होणारे नुकसान टाळता येणे शक्य आहे. या किडीचा प्रौढ पतंग १ ते २ सेंटिमीटर आकाराचा असून पिवळसर रंगाचा असतो. मादी पतंगाच्या दोन्ही पंखावर खालील बाजूस काळसर ठिपका असतो तर नर पतंगाच्या पंखावर ठिपका नसतो. सध्याच्या काळात मादी पतंग पानाच्या शेंड्यावर ५० ते ६० अंडी घालून त्यावर केसांचे आच्छादन टाकून झाकून घेते. एक मादी ३ ते ४ ठिकाणी अंडी घालते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी घ्यावी योग्य काळजी : वेळीच करा उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धानाच्या कमी उत्पादनास विविध किडरोग हे एक मुख्य कारण आहे. जिल्ह्यात धानपिका शिवाय दुसºया पिकांची फेरपालट जास्त प्रमाणात होत नाही. तसेच मागील वर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाचे क्षेत्र असल्याने व यावर्षी वेळेत पावसाला सुरुवात झाल्याने खोडकिडीस पोषक वातावरण तयार झाले आहे.त्यामुळे धानाच्या रोपवाटिकेमध्येच खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकात्मिक व्यवस्थापनाद्वारे रोपवाटिकेत खोडकिडीचे नियंत्रण करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.त्यामुळे धान खोड किडीचे सुरवातीच्या टप्प्यात नियंत्रण होऊन रोवणीनंतर होणारे नुकसान टाळता येणे शक्य आहे. या किडीचा प्रौढ पतंग १ ते २ सेंटिमीटर आकाराचा असून पिवळसर रंगाचा असतो. मादी पतंगाच्या दोन्ही पंखावर खालील बाजूस काळसर ठिपका असतो तर नर पतंगाच्या पंखावर ठिपका नसतो. सध्याच्या काळात मादी पतंग पानाच्या शेंड्यावर ५० ते ६० अंडी घालून त्यावर केसांचे आच्छादन टाकून झाकून घेते. एक मादी ३ ते ४ ठिकाणी अंडी घालते. ५ ते ८ दिवसात अंड्यामधून अळ्याबाहेर येऊन खोडात प्रवेश करतात व आतील भाग पोखरु न खातात. यामुळे गाभा मर होऊन कीडग्रस्त फुटवे निघतात. तर दाणे भरण्याच्यावेळी पांढऱ्या लोंबी निघतात.रोपवाटिकेत तसेच रोवणीपूर्वी रोपांच्या शेंड्यावरील अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत. पाच टक्के निंबोळी अर्काची दहा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. शेतात प्रकाश सापळ्यांचा वापर करून पतंगांचा नायनाट करावा. रोपांची मुळे रोवणीपूर्वी क्लोरोपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) १ मिली प्रती लिटर पाणी याप्रमाणे तयार द्रावणात १२ तास बुडवून ठेवावीत.या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी कामगंध सापळे प्रती एकरी ४ ते ८ याप्रमाणे शेतात लावून नर पतंगांचा नायनाट करता येतो. रोपवाटिकेमध्ये आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास दाणेदार १० टक्के फोरेट १० किलो किंवा ५ टक्के क्वीनॉलफॉस किंवा कार्बोफुरॉन शेतात पुरेसा ओलावा असताना टाकावे. उपलब्ध असल्यास ट्रायकोग्रामा जपोनीकम या परोपजीवी किटकाची प्रती हेक्टरी ५०,००० अंडी याप्रमाणात ८ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा सोडावेत.या उपायांचा वापर करून शेतकऱ्यांनी खोड किडीचे नियंत्रण करावे. शेतात खोडिकडीचा प्रादुर्भाव आढळल्यास आपल्या कृषी सहाय्यकाशी संपर्ककरून त्यांच्या मार्गदर्शनात उपाययोजना कराव्यात.

टॅग्स :agricultureशेती